शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

गणपतीसाठी फुले तोडली म्हणून गळा दाबून मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2016 00:07 IST

शिकवणी वर्गासाठी गेलेल्या बालकाने गणपतीच्या पूजेसाठी एका घराच्या आवारातील फुले तोडली.

तक्रार दाखल : चिमुरड्याला बेदम मारहाण, आरोपी पसारअमरावती : शिकवणी वर्गासाठी गेलेल्या बालकाने गणपतीच्या पूजेसाठी एका घराच्या आवारातील फुले तोडली. ही बाब घरमालकाच्या लक्षात येताच त्याने बालकाचा पाठलाग करून त्याला पकडले आणि बेदम मारहाण करीत गळा दाबून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना १२ सप्टेंबर रोजी नांदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामनगरात घडली. पोलिसांनी त्या निर्दयी इसमाचा शोध सुरु केल्यानंतर तो पसार झाला आहे. रहाटगाव येथील रहिवासी आशा गिरी यांच्या घरात भाड्याने राहणारा ईश्वर सुनील ढवळी (१३) हा दररोज रामनगर परिसरात शिकवणीकरीता जातो. १२ सप्टेंबर रोजी तो त्याच्या काही मित्रांसोबत शिकवणीला गेला होता. घरी परतताना तो वाटेत दिसणारी फुले गणपतीसाठी गोळा करीत होता. एका घराच्या आवारातील काही फुले त्याने तोडली. दरम्यान त्याचा पाठलाग करणाऱ्या ॅइसमाने त्याला मार्गातच गाठले. त्याने ईश्वरला शिवीगाळ सुरू केल्याने त्याचे अन्य मित्र पळून गेले. ईश्वर मात्र त्याच्या तावडीत सापडला. घराच्या आवारातील फुले तोडली म्हणून संतापलेल्या त्या व्यक्तिने ईश्वरला बेदम मारहाण करीत गळा दाबून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीमुळे व गळा दाबण्याचा प्रयत्न झाल्याने ईश्वर अस्वस्थ झाला होता. ईश्वरला मारहाण सुरु असल्याने काही वेळ तेथे बघ्यांची गर्दी जमली होती. चिमुरडयाला मारहाण करताना पाहून अनेकांनी त्या इसमाला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने मारहाण करणे सुरूच ठेवले. काही वेळात शेकडो नागरिक घटनास्थळी जमले आणि त्यांनी ईश्वरला त्या इसमाच्या तावडीतून सोडविले. अत्यंत घाबरलेल्या व अस्वस्थ झालेल्या ईश्वरवर प्रथमोपचार करून बघ्यांपैकी काहींनी त्याला त्याच्या घरी नेऊन सोडले. या घटनेची तक्रार ईश्वरचे वडिल सुनील ढवळी यांनी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात केली आहे. ईश्वर मारहाण करणाऱ्या इसमाला चेहऱ्यानिशी ओळखतो. त्या अज्ञात इसमाच्या घराची ओळख ईश्वरने पटवून दिली असून मात्र, ईश्वरला मारहाण करणारा त्या घरातील ईसम मात्र अद्याप फरार असल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे.