शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्रांच्या आधारे पीककर्ज उचलण्याचा प्रयत्न

By admin | Updated: October 9, 2014 22:56 IST

बँकेत बनावट कागदपत्रे सादर करून पीक कर्जाची उचल करण्याचा प्रयत्न विचोरी येथील शेतकरी पिता-पुत्राने केला. परंतु ऐन प्रक्रियेदरम्यान बँक व्यवस्थापकाच्या ही बाब लक्षात येताच त्यांची कर्ज

चांदूरबाजार : बँकेत बनावट कागदपत्रे सादर करून पीक कर्जाची उचल करण्याचा प्रयत्न विचोरी येथील शेतकरी पिता-पुत्राने केला. परंतु ऐन प्रक्रियेदरम्यान बँक व्यवस्थापकाच्या ही बाब लक्षात येताच त्यांची कर्ज प्रक्रिया थांबविण्यात आली. या प्रकरणाची शिरखेड पोलीस ठाण्यांत तक्रार करण्यात आली आहे. दामोधर फुलेराव हरबास (६२), देवेंद्र ऊर्फ पिंट्या दामोधर हरबास (३५) अशी शेतकरी पिता-पुत्रांची नावे आहेत.हरबास यांचे मौजा नबीपूर येथे त्यांचे शेत आहे. या शेतीच्या वाढीव पीक कर्जासाठी त्यांनी रिध्दपूर येथील बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेत अर्ज केला. पीक कर्ज प्रक्रियेकरिता बँकेच्या पॅनेलवर असलेले अधिवक्ता मनमोहन भुतडा यांची नेमणूक करण्यात आली. बँकेने हरबास यांना वाढीव पीक कर्जाकरिता मनमोहन भुतडा यांच्याकडून सर्च रिपोर्ट आणायला सांगितला होता. त्यानुसार भुतडा यांनी एका सीलबंद पाकिटात ११ सप्टेंबर २०१४ रोजी शाखा व्यवस्थापकाच्या नावे सर्च रिपोर्ट दिला. परंतु दामोधर हरबास व देवेंद्र हरबास यांनी हा सीलबंद लिफाफा फोडून त्यातील कागदपत्रे बदलविली. या लेटरपॅडवर बनावट शिक्कादेखील मारला आणि खोटी सही करून ही कागदपत्रे बँक आॅफ महाराष्ट्रच्या रिध्दपूर शाखेत जमा केली. यासाठी त्यांनी महसूल विभागाचा जुना सातबाराही जोडला होता. या कागदपत्रांच्या आधारे बँकेच्या शाखा व्यवस्थापकांनी दामोधर, देवेंद्र हरबास यांना वाढीव पीक कर्जाची देयके दिली. ती वठविण्याकरिता हरबास पिता-पूत्र चांदूरबाजार शाखेत पोहोचले. परंतु कागदपत्रांवर खोडतोड केलेली आढळल्याने त्यांनी तत्काळ मनमोहन भुतडा यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर या फसवाफसवीचा खुलासा झाला. शाखा व्यवस्थापकाने पिता-पुत्रांना दिलेली देयके थांबविली व नवीन सातबारा आणण्यास सांगितले. सातबारा आणण्यास त्यांनी वारंवार टाळाटाळ केल्याने या पिता-पुत्राचा खोटारडेपणा उघडकीस आला.