शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
3
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
4
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
5
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
6
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
8
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
9
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
10
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
11
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
12
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
13
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
14
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
15
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
16
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
17
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
18
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
19
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
20
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू

तंत्र शिक्षण प्रवेश प्रक्रियेत घोळ

By admin | Updated: July 11, 2016 00:06 IST

तंत्र शिक्षण विभागाच्यावतीने अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी राबविण्यात आलेल्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

शिवसेनेची धडक : आॅनलाईनमुळे भवितव्य धोक्यातअमरावती : तंत्र शिक्षण विभागाच्यावतीने अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी राबविण्यात आलेल्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. ११ जुलै रोजी तंत्र शिक्षण सहसंचालक कार्यालयावर धडक देवून ही प्रक्रिया नव्याने राबविण्याची मागणी केली जाणार असल्याचे शिवसेनेचे महानगरप्रमुख सुनील खराटे यांनी रविवारी पत्रपरिषदेतून दिली.आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत घोळ झाल्यामुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याची कैफियत शिवसेनेने मांडली. खराटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तंत्र शिक्षण अभ्यासक्रम प्रवेशासाठी नियमानुसार आॅनलाईन अर्ज भरताना प्रत्येक विद्यार्थ्याला तीन पर्याय दिले जातात. त्यानुसार अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रि येसाठी फ्रीज, स्लॉईड व फ्लोट असे पर्याय होते. मात्र या पर्यायात ज्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा प्रवेशासाठी क्रमांक लागतो, त्या पर्यायात तो लॉक होऊन अन्य त्या विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित होतो. परंतु आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत घोळ असल्यामुळे फ्रीज हा पर्याय निवडून सुद्धा संबंधित विद्यार्थ्यांचे नाव यादीत आले नाही, असे सुनील खराटे यांनी आॅनलाईन प्रवेशासाचे दाखल देत तंत्र शिक्षण विभागाच्या कारभारावर वाभाडे काढले.स्लाईड हा दुसरा पर्याय असून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या यादीत नाव आले आहे, त्याच महाविद्यालयात निवड झालेल्या ब्रँच प्रमाणे इतर ब्रँचसाठी विद्यार्थी पात्र ठरतो. मात्र अनेकांनी हा पर्याय निवडून आॅनलाईन भरलेल्या अर्जासाठी प्रवेश दाखविले नाहीत. पहिल्या व दुसऱ्या फेरीत घोळ असल्याने अभियांत्रिकी प्रवेशसाठी पात्र १ लाख १७ हजार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी हा खेळ असल्याचे शिवसेनेचे म्हणने आहे.-तर न्यायालयात जाऊतंत्र शिक्षण विभागाने अभियांत्रिकी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया रद्द करून ती नव्याने घेतली नाही तर या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेऊन विद्यार्थ्यांना न्याय देण्याची भूमिका शिवसेना घेणार असे सुनील खराटे यांनी सांगितले. संवैधानिक मार्गांने प्रश्न सोडविण्यासाठी अगोदर प्रयत्न असेल. प्रशासनाने ऐकले नाही तर कायदेशीर मार्ग स्वीकारणार, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.