शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

समाजकल्याणच्या कनिष्ठ लिपिकाला मागितली खंडणी

By admin | Updated: December 27, 2015 00:30 IST

समाजकल्याण विभागाच्या कनिष्ठ लिपिकाला खंडणी मागितल्याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी प्रबुध्द नगरातील रहिवासी नीलेश मेश्राम याच्याविरुध्द शुक्रवारी रात्री गुन्हा नोंदविला आहे.

खळबळ : नीलेश मेश्रामविरुध्द तिसऱ्यांदा गुन्हा दाखल अमरावती : समाजकल्याण विभागाच्या कनिष्ठ लिपिकाला खंडणी मागितल्याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी प्रबुध्द नगरातील रहिवासी नीलेश मेश्राम याच्याविरुध्द शुक्रवारी रात्री गुन्हा नोंदविला आहे. नीलेश मेश्रामवर महिनाभरात तीन खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस सूत्रानुसार, समाज कल्याण विभागात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असणारे विनोद एकनाथ जामनेकर (४६, रा. महादेव खोरी) यांच्याकडे कन्यादान योजना, मोटार वाहन योजना व मागासवर्गीय गृहनिर्माण योजना अशा विविध कामाची जबाबदारी आहे. या कामासंदर्भात प्रबुध्द नगरातील रहिवासी नीलेश मेश्राम याने माहिती अधिकारात अर्ज करून काही माहिती मागविली होती. त्यानंतर विनोद जामनेकर व त्यांच्या दोन सहकारी कर्मचाऱ्यांना पैशासाठी त्रास देणे सुरू केले होते. त्यानंतर काही दिवसांत नीलेशने विनोद जामनेकरविरुध्द एक खोटी पोलीस तक्रारसुध्दा दिली. हे प्रकरण दडपण्यासाठी त्याने विनोद जामनेकरला १ लाखांची मागणी केली होती. त्यावेळी विनोदनी त्याला भीतीपोटी १५ हजार रुपये दिले. त्यांना खोट्या गुन्ह्यात फसविण्याची धमकी नीलेशने दिली होती. यासंदर्भात चर्चेकरिता त्याने ८ डिसेंबरला विनोदला महादेव खोरी येथील पुलावर बोलाविले होते. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. नीलेशच्या त्रासामुळे अखेर विनोद यांनी फे्रजरपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली. याप्रकरणी पोलिसांनी निलेश मेश्रामविरुध्द खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)