शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी, अशिक्षितांच्या जुन्या नोटा कचऱ्यासमान

By admin | Updated: February 15, 2017 00:10 IST

केंद्र सरकारने नोव्हेंबर महिन्यात नोटाबंदीचा आदेश जारी केला व जुन्या नोटा ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत राष्ट्रीयीकृत बँकेत जमा करण्याचे आदेश दिले होते.

रिझर्व्ह बँकेचाही नकार : गरिबांची जबाबदारी शासन घेणार का?संजय खासबागे वरूडकेंद्र सरकारने नोव्हेंबर महिन्यात नोटाबंदीचा आदेश जारी केला व जुन्या नोटा ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत राष्ट्रीयीकृत बँकेत जमा करण्याचे आदेश दिले होते. यानंतरही राहिलेल्या नोटा रिझर्व्ह बँकेत जमा कराव्यात, असे सांगण्यात आले होते. परंतु आदिवासी ग्रामीण भागातील शेतमजूर, शेतकऱ्यांना खेड्यातून शहरात येऊन या नोटा बँकामध्ये जमा करणे शक्य झाले नसल्याने ३१ तारखेनंतरसुद्धा त्यांच्याकडेच राहिल्या. आता रिझर्व्ह बँकही या नोटा स्वीकारत नसल्याने हजारोंचा फटका बसत आहे. आता या गरिबांची जबाबदारी घेणार तरी कोण, हा प्रश्न निर्माण झाला आहे. नोटाबंदीचे विपरीत परिणाम जाणवत असल्याचा सूर उमटत आहे. ३१ डिसेबरपर्यंत कोणत्याही राष्ट्रियीकृत बँकेत नोटा जमा करून बदलवून घेण्याचे आदेश मोदी सरकारने दिले होते. ग्रामीण भागासह, डोंगरदऱ्यातील आदिवासी भागात राहणाऱ्या नागरिकांच्या मात्र हा निर्णय पचनी पडला नसून आजही त्यांच्याकडे हजार आणि पाचशेच्या नोटा कायम आहेत. शासनाने ३१ डिसेंबरनंतर रिझर्व्ह बँकेत बदलवून मिळणार, अशी घोषणा केली होती. परंतु जानेवारीपासून केवळ विदेशातून आलेल्या व्यक्तीच्या नोटा बदविल्या जात आहे. अनेकजण नागपूरच्या रिझर्व्ह बँकेत नोटा बदलविण्याकरिता गेले असता त्यांच्यावर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली गेली. त्यामुळे हे निरक्षर लोक आल्यापावली परतले. ग्रामीण भागातील म्हाताऱ्या, अशिक्षित, शेतमजूर, शेतकऱ्यांना या निर्णयाचा जबर फटका बसला आहे. विविध कारणांनी ग्रामीण भागातील लोकांनी नोटा जमविल्या होत्या.लोकप्रतिनिधींनीही फिरवली पाठग्रामीण भागातील निरक्षर, अज्ञानी लोकांना नोटाबंदीचा फटका बसला. परंतु त्यांच्या बाजूने भांडण्याकरिता कोणताही लोकप्रतिनिधी समोर आला नाही. प्रत्येकजण आपापली पोळी शेकण्यात व्यस्त आहे. आता तर निवडणुकीचे वातावरण असल्याने गरिबांना कुणीच वाली राहिलेला नाही.