शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी रेनकोट खरेदीचा मुहूर्त सापडेना

By admin | Updated: July 14, 2016 00:23 IST

आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना रेनकोट खरेदीचा मुहूर्त अद्यापही सापडत नाही.

प्रतिज्ञापत्र सादर : मुख्याध्यापकांचे अधिकार गोठविले अमरावती: आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना रेनकोट खरेदीचा मुहूर्त अद्यापही सापडत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पावसाळ्यानंतर रेनकोट देणार काय? असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे शासनाने नामुष्की टाळण्यासाठी मुख्याध्यापकांना रेनकोट खरेदीचे अधिकार गोठविण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी प्रतीज्ञापत्र सादर केले आहे. गत १० दिवसांपूर्वी आदिवासी विकास विभागाने ई-निविदा प्रक्रिया रद्द करुन मुख्याध्यापकांना रेनकोट खरेदीचे अधिकार बहाल केले होते. परंतु शासन आदेशानुसार खरेदी प्रक्रिया ई- निविदेनुसारच झाली पाहिजे, असे असताना आदिवासी विकास विभागाने कोणाच्या आदेशानुसार मुख्याध्यापकांना तीन लाखांपर्यत रेनकोट खरेदी करण्याचे अधिकार बहाल केले, यासंदर्भात प्रतीज्ञापत्र सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार आदिवासी विकास विभागाचे उपसचिव सु. ना. शिंदे यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात प्रतीज्ञापत्र सादर करुन मुख्याध्यापकांना रेनकोट खरेदीचे अधिकार गोठविण्याचे स्पष्ट केले आहे. आता रेनकोट खरेदी ही प्रचलित पद्धतीने होणार असून मुख्याध्यापकांचे अधिकार गोठविले जाणार आहे. अपर आयुक्त कार्यालयातंर्गत येणाऱ्या प्रकल्प कार्यालय स्तरावर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी रेनकोट खरेदीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. गतवर्षी देखील आदिवासी विद्यार्थ्यांना पावसाळा संपत असताना रेनकोट मिळाले होते. यंदाच्या पावसाळयात तरी रेनकोट मिळणार की नाही? हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्त कार्यालयातंर्गत धारणी, कळमनुरी, अकोला, औरंगाबाद, पुसद, नांदेड, किनवट या प्रकल्प कार्यालय स्तरावर रेनकोट खरेदी केली जाणार आहे. (प्रतिनिधी) ई-निविदेद्वारे प्रस्ताव आमंत्रित आदिवासी विकास विभाग आता प्रकल्प कार्यालय स्तरावर ई- निविदा प्रक्रियेनुसार रेनकोट खरेदी करणार आहे. त्यानुसार कोर्टात प्रतीज्ञापत्र देखील सादर करण्यात आले आहे. यापूर्वी रेनकोट ंरेदीसाठी राबविलेली ई- निविदा प्रक्रिया कायम ठेवावी अथवा नव्याने राबवावी, याविषयीचा निर्णय प्रकल्प अधिकाऱ्यांना घ्यावा लागणार आहे. राज्यात आश्रमशाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी रेनकोट खरेदी ई-निविदेनुसार होत असताना केवळ धारणी प्रकल्प कार्यालय अपवाद ठरले. मात्र आता कोर्टात प्रतीज्ञापत्र सादर करण्यात आल्यामुळे यापूर्वीची रेनकोट खरेदी नियमबाह्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. चुन्नीलाल धांडे अध्यक्ष, अ.भा. आदिवासी विकास परिषद आदिवासी विकास विभागाने २२ जून २०१६ रोजी आश्रमशाळांच्या मुख्याध्यापकांना तीन लाखांपर्यत खरेदीचे अधिकार बहाल केले होते. मात्र याप्रकरणी उच्च न्यायालयाने प्रतीज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होेते. त्यानुसार बुधवारी कोर्टात प्रतीज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. सु. ना. शिंदे,उपसचिव, आदिवासी विकास विभाग