शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

फत्तेपूर शिवणगाव येथे वृक्षरोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:10 IST

फोटो - कुर्हा ओ १५ कुऱ्हा : तिवसा तालुक्यातील फत्तेपूर शिवणगाव येथे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत ...

फोटो - कुर्हा ओ १५

कुऱ्हा : तिवसा तालुक्यातील फत्तेपूर शिवणगाव येथे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत सार्वजनिक स्वच्छता संकुल बांधकामाचे भूमिपूजन व वृक्षरोपण करण्यात आले. याप्रसंगी पंचायत समिती सभापती शिल्पा हांडे, पंचायत समिती उपसभापती शरद वानखडे, पंचायत समिती सदस्य नीलेश खुळे, गटविकास अधिकारी चेतन जाधव, सचिव तिरमारे, सरपंच प्रियांका चव्हाण, उपसरपंच नंदकिशोर पोलगावंडे, सदस्य राजकला कठाडे, संगीता खडसे, धर्मराज खडसे, प्रियांका पांडे, रोजगार सेवक एकनाथ गुजर, राधाकिसन लढ्ढा, आनंदराव पांडे, हनुमंतराव पांडे, माणिकराव एंडॊले, प्रमोद पांडे, मनोज कुरवाडे आदी उपस्थित होते.

----------

बेलोरा स्टॉप येथून दुचाकी लंपास

चांदूर बाजार : शहरातील बेलोरा स्टॉप येथे ऑटोरिक्षाचे साहित्य घेण्यासाठी गेलेले दिनेश शंकरराव खडसे (४५, रा. चिंचोली काळे) यांची दुचाकी (एमएच २७ डीबी २२४८) अज्ञात चोरट्याने लंपास केली. १० जुलै रोजी ही घटना घडली. चांदूर बाजार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

----------

अतिक्रमणावरून अचलपुरात मारहाण

अचलपूर : शहरातील बियाबानी येथे मशिदीच्या अतिक्रमण केलेल्या जागेवर बांधकाम करू नको, असे सांगितल्यावरून शेख सिराज अहमद अब्दुल (५२) यांना बिस्मिल्ला खान रहमान खान, तौसिफ खान रहीम खान, रहमान खान, इब्राहिम खान रहमान खान, रहीम खान रहमान खान यांनी मारहाण केली. पोलिसांनी १४ जुलै रोजी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.