शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडीचा बट्ट्याबोळ

By admin | Updated: May 25, 2017 00:10 IST

शासनाने मोठा गाजावाजा करून राज्यातील प्रत्येक तालुक्यात वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य ठरवून दिले व त्यानुसार तालुक्यातील प्रत्येक गावात वृक्षारोपण करण्यात आले.

नांदगावात झालेच नाही रोपट्यांचे संवर्धन : पाण्याअभावी झाडे सुकली, लाखोंचा खर्च वायालोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : शासनाने मोठा गाजावाजा करून राज्यातील प्रत्येक तालुक्यात वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य ठरवून दिले व त्यानुसार तालुक्यातील प्रत्येक गावात वृक्षारोपण करण्यात आले. मात्र, ही वृक्ष लागवड केवळ ‘फोटोसेशन’पुरती मर्यादित राहिल्याने तालुक्यात शतकोटी वृक्ष लागवड योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे. पाण्याअभावी बहुतांश झाडे सुकली असून तालुक्यात वृक्ष लागवड योजना फसल्याचे दिसून येत आहे.प्रशासकीय पातळीवर तहसील कार्यालयाला १३३९३ वृक्षलागवडीचे उद्दिष्ट्य देण्यात आले होते तर नगरपंचायतीला ५०० झाडांचे उद्दिष्ट्य देण्यात आले होते. सन २०१५-१६ च्या वृक्ष लागवड योजनेत तहसील कार्यालयामार्फत८३०० झाडे लावण्यात आली तर नगर पंचायतीच्यावतीने सुद्धा ५०० झाडे लावण्यात आली. त्याचप्रमाणे पंचायत समितीमार्फत देखील काही प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली. तालुक्यातील बहुतांश गावांत तसेच नांदगाव शहरात राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी सुद्धा वृक्षलागवड केली. परंतु वृक्षारोपणानंतर याझाडांच्या संगोपनाकडे पूर्णत: दुर्लक्ष झाल्यामुळे शतकोटी वृक्ष लागवड योजनेतील एकही झाड जिवंत नसल्याचे दिसून येत आहे. शतकोटी वृक्ष लागवड योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने मोठा आटापिटा केला. परंतु प्रशासकीय पातळीवर योजनेला ठेंगा दाखविला जात असल्याने शासनाच्या आदेशाला प्रशासन कसा हरताळ फासत आहे, ही बाब यावरून निदर्शनास येते. पर्यावरणाशी संबंधित संभाव्य धोका टाळण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या वृक्षलागवड योजनेतच जर प्रशासन हलगर्जीपणा करीत असेल तर योजनेचा उद्देश कसा सफल होणार, हा प्रश्नच आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांचे पद मागिल काही दिवसांपासून रिक्त असल्यामुळे शतकोटी वृक्ष लागवड योजनेची ऐशीतैशी झाली आहे. २०१७-१८ मध्ये मिळेल का योजनेला यश ?सन २०१७-१८ मध्ये सुद्धा वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले जाणार आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर शासनाची दिशाभूल होऊ नये, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. निव्वळ वृक्ष लागवड करून होेणार नाही तर त्यांची जोपासना होणे सुद्धा गरजेचे आहे. अन्यथा सन २०१५-१६ च्या शतकोटी वृक्षलागवड योजनेचा ज्याप्रमाणे बट्ट्याबोळ झाला तशीच गत सन २०१७-१८ मध्ये झाल्यास योजनेचे पूर्णत: बारा वाजतील, हे निश्चित आहे. त्यामुळे सन २०१७-१८ ची वृक्ष लागवड प्रशासकीय अधिकारी यशस्वीपणे पार पाडतील का, याबाबत शंकाच आहे.