शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

अवैध जनावरे वाहून नेणाऱ्या वाहनाला ट्रॅव्हल्सची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:14 IST

फोटो पी २० नांदगाव नांदगाव पेठ : अवैधरीत्या जनावरांना कोंबून नेणाऱ्या व्हॅनला ट्रॅव्हल्सने दिलेल्या जबर धडकेत ...

फोटो पी २० नांदगाव

नांदगाव पेठ : अवैधरीत्या जनावरांना कोंबून नेणाऱ्या व्हॅनला ट्रॅव्हल्सने दिलेल्या जबर धडकेत व्हॅनचा क्लीनर जागीच ठार झाला, तर वाहनांमध्ये असलेल्या आठ गाईंसह दोन गोवंशाचा अपघातात मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी ६.३० च्या दरम्यान रहाटगाव रिंग रोडनजीक घडली. घटनेत व्हॅनचा चालकदेखील गंभीर जखमी असून, त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नासीर खान अकबर खान असे अपघातात ठार झालेल्या क्लीनरचे नाव आहे, तर संगम मोहोड हा चालक गंभीर जखमी आहे.

पहाटे साडेसहा वाजताच्या दरम्यान एमएच २७ बीएक्स ४८०६ ही व्हॅन अवैधरीत्या जनावरे घेऊन अमरावतीकडे भरधाव जात असताना, व्हॅनच्या चालकाने रिंग रोडच्या दिशेने वाहन वळविले. त्यामुळे विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅव्हल्स (एमएच २० ईएल ८००) ने व्हॅनला जोरदार धडक दिली. दोन्ही वाहने भरधाव असल्याने ट्रॅव्हल्सने दूरपर्यंत व्हॅनला घासत नेले. यामध्ये क्लिनर नासीर खान अकबर खान हा जागीच ठार झाला, तर चालक संगम मोहोड गंभीर जखमी झाला. वाहनांमध्ये कोंबून नेण्यात येत असलेल्या आठ गाई व दोन गोवंशचादेखील अपघातात मृत्यू झाला.

घटनेची माहिती नांदगाव पेठ पोलिसांना कळताच तातडीने पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला. जखमी चालकाला तसेच मृताला रुग्णवाहिकेच्या मदतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहचविले, तर अपघातात मृत जनावरांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.