शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

मंजुरी नसतानाही टॉवर उभारणी

By admin | Updated: November 9, 2015 01:58 IST

महानगरात ४ जी इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी रस्ता दुभाजक आणि चौकांतील आयलँडमध्ये उभारण्यात येत

अमरावती : महानगरात ४ जी इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी रस्ता दुभाजक आणि चौकांतील आयलँडमध्ये उभारण्यात येत असलेल्या अनधिकृत मोबाईल टॉवरवर महापौरांनी आक्षेप घेतला आहे. आमसभेने मंजुरी दिली नसताना रिलायन्स कंपनीचे टॉवर उभारले जात आहे. शहराची ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. ४ जी सेवेशिवाय स्मार्ट फोन निरर्थक ठरेल, हे जरी खरे असले तरी रिलायन्स कंपनीने मोबाईल टॉवर उभारणीसाठी महापालिकेकडे अर्ज सादर केला होता. या अर्जाच्या अनुषंगाने प्रशासनाने ४जी सेवा पुरविण्यासाठी मोबाईल टॉवर उभारणीच्या मान्यतेचा विषय स्थायी समितीपुढे ठेवला होता. स्थायी समितीने हा विषय मान्य करून पहिल्या टप्प्यात ८ मोबाईल टॉवर उभारणीसाठी परवानगी दिली होती. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर मोबाईल टॉवर उभारणीचा विषय २० मे २०१५ रोजीच्या आमसभेत ठराव क्र. १४ व १६ जून २०१५ च्या सभेत कायम करण्यात आला. यावेळी महापौर चरणजितकौर नंदा यांनी या विषयाला मंजुरी देताना मोबाईल टॉवर उभारणीचा डीपीआर तयार करण्याचे निर्देश दिले होते. एवढेच नव्हे, तर मोबाईल एजन्सीला काम देण्याचे ठरले. त्यांच्यासोबत अटी, शर्तीच्या करारनाम्यासह संपूर्ण डीपीआरला सभागृहाची मंजुरीसाठी ठेवण्यात यावे, असा निर्णय दिला होता. मात्र, प्रशासनाने आमसभेच्या निर्णयाला गुंडाळले आहे. डीपीआर तयार न करता रिलायन्स जिओ इन्फोटेक कंपनीला परस्पर मोबाईल टॉवर उभारणीची मान्यता दिली आहे. हे मोबाईल टॉवर कोणत्या जागेवर उभे राहणार ही माहिती एकाही नगरसेवकांना नाही. शहरात किती मोबाईल टॉवर उभारले जाणार हे कोणासही कळू शकत नाही. परंतु रिलायन्सचे भव्य मोबाईल टॉवर उभारणीचे काम युद्धस्तरावर सुरू झाले आहे. डीपीआरला आमसभेपुढे ठेवले नसताना ४जी सेवेचे मोबाईल टॉवर कसे उभारले जात आहे, असा सवाल महापौरांनी सहायक संचालक नगररचना विभागाला एका पत्राद्वारे केली आहे. मोबाईल टॉवर उभारणीचे काम तातडीने बंद करून डीपीआर आमसभेपुढे ठेवल्याशिवाय कोणतीही कार्यवाही करू नये, अशा सूचना महापौरांनी प्रशासनाला दिल्या आहेत.अजय गोंडाणे यांनी मोबाईल टॉवर उभारणी उधळली४रिलायन्स कंपनीकडे मोबाईल टॉवर उभारणीची लेखी परवानगी नसल्याचे कारण पुढे करुन नगरसेवक अजय गोंडाणे यांनी जुन्या बायपासवरील यशोदानगर रस्ते दुभाजकावर उभारले जाणारे मोबाईल टॉवर उधळून लावले. ही घटना गत आठवड्यात घडल्याचे अजय गोंडाणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. विशेषत: हे मोबाईल टॉवर रात्रीच्या वेळेस उभारले जातात.सभागृहात मान्यतेपूर्वी मोबाईल टॉवर उभारणीसंदर्भाचा डीपीआर तयार करणे अनिवार्य होते. तसा निर्णय आमसभेत झाला होता. तरीदेखील प्रशासनाने काय केले, हे समजले नाही. थेट मोबाईल टॉवर उभारले जात आहे. हे मोबाईल टॉवर काढल्याशिवाय सभागृहात विषय मंजुरीसाठी घेणार नाही. - चरणजितकौर नंदा, महापौर,.