शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

जीवघेण्या रस्त्यावरून खडतर प्रवास

By admin | Updated: January 3, 2016 00:42 IST

तालुक्यातील जिल्हा परिषदेत बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

वाहन चालकांमध्ये तीव्र रोष : अनेक रस्ते गेले खड्ड्यात चांदूरबाजार : तालुक्यातील जिल्हा परिषदेत बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्यांचे काम काही महिन्यांपूर्वीच झाले असतानाही त्या रस्त्याचेसुद्धा बारा वाजले आहे. त्यामुळे या रस्त्यांवर वाहनचालकाला वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघाताच्याही प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे जि. प. बांधकाम विभागाबाबत वाहन चालकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. तालुक्यातील जसापूर ते निंबोरा रस्त्याचे काम दीड वर्षापूर्वी झाले असताना रस्ता उखडू लागला आहे. रस्ता एका बाजूने दबणेसुद्धा सुरू झाले आहे. लाखनवाडी ते करजगाव रस्त्यावर जि. प. अंतर्गत ६० लक्ष रूपये खर्च करण्यात आले. मात्र दीड वर्षातच या रस्त्याचे धिंडोळे निघाले. चांदूरबाजार ते जसापूर या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. कोदोरी ते काजळी रस्त्याचे बांधकाम १८ जून २०११ रोजी पूर्ण झाले होते. आज याची दुर्दशा झाली आहे. ठिकठिकाणी या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. जसापूर ते कोदोरी रस्त्यावरील खड्ड्यांनी तर कहरच केला आहे. याच रस्त्यावर पूर्णा प्रकल्पामधून सिंचनाकरिता सोडण्यात येत असलेल्या कालव्यातील अतिरिक्त पाणी या रस्त्यावरून वाहत असल्याने रस्ता खरडून गेला. जिल्हा परिषदेत बांधकाम विभाग निद्रावस्थेतच आहे. कामाचे फलक गायब कोणतेही काम करण्यापूर्वी काम कोणत्या निधीमधून मंजूर आहे, कामावर किती रूपये खर्च मंजूर आहे. कामाचा कालावधी, कामाचे अंतर किती व कंत्राटदाराचे नाव असे फलक लावणे आवश्यक असते. मात्र कामाबाबत सर्वसामान्यांना माहिती होऊ नये व कामातील काही मलीदा आपल्याला खाता यावा, या उद्देशाने असे कामाचे फलक लावणेसुद्धा बंद झाले आहे. पावसाळ्यापूर्वीच खड्डे बुजविले गरजेचे पावसाळ्यापूर्वी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविणे आवश्यक असते. कारण पाऊस आल्यानंतर ते खड्डे बुजविणे अशक्य आहे. तसेच पाणी साचून राहत असल्याने वाहनधारकांना त्याचा अंदाज लागत नाही. परिणामी अपघाताला सामोरे जावे लागते.