शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

धामणगावात तक्रारींसाठी आता टोल फ्री क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 22:05 IST

पाणी, रस्ते, स्वच्छता तसेच पायाभूत सुविधांबाबत अडचणींची तक्रार प्रत्येक नागरिकाला घरबसल्या मोबाइलवरून करता येणार आहे. या तक्रारीची नोंद, ट्रॅकिंग व फॉलोअप होऊन तक्रारकर्ता हा थेट नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांपर्यंत पोहोचेल. नगर परिषदेने स्तरावर राबविलेला हा राज्यातील पहिला प्रयोग आहे.

ठळक मुद्देनगर पालिकेचा उपक्रम : राज्यात पहिला प्रयोग
<p>लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : पाणी, रस्ते, स्वच्छता तसेच पायाभूत सुविधांबाबत अडचणींची तक्रार प्रत्येक नागरिकाला घरबसल्या मोबाइलवरून करता येणार आहे. या तक्रारीची नोंद, ट्रॅकिंग व फॉलोअप होऊन तक्रारकर्ता हा थेट नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांपर्यंत पोहोचेल. नगर परिषदेने स्तरावर राबविलेला हा राज्यातील पहिला प्रयोग आहे.धामणगावचे नगराध्यक्ष प्रताप अडसड यांनी जनतेच्या सुविधांना प्राधान्य दिले आहे. यामुळे आयआयएमएस या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून नागरिकांना आपली तक्रार घरी बसून नोंदविता येणार आहे.प्रत्येक नागरिकाचे होणार समाधान आयआयएमएस हे सॉफ्टवेअर मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये काम करेल. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जनतेच्या तक्रारींच्या वर्गीकरणानुसार वेगवेगळ्या विभागांत प्रत्येकाची तक्रार पोहोचेल. याद्वारे प्रत्येकाचे समाधान होणार आहे.कमी दिवसांत होणार तक्रारींचे निरसनकुठल्याही तक्रार किंवा माहितीची सॉफ्टवेअरमध्ये नोंद होताच त्यामधील संबंधित विभागाच्या डॅशबोर्डवर तक्रार किंवा माहिती प्रदर्शित होईल तसेच संबंधित विभागीय अधिकाºयाला एसएमएसच्या माध्यमातून तक्रार वा माहिती पाठविली जाईल. त्याचवेळी तक्रार करणाºया व्यक्तीला तक्रार क्रमांक एसएमएसद्वारे पाठविण्यात येणार आहे. सदर तक्रारींचे निरसन कमीत कमी कालावधीत करण्याचा प्रयत्न राहणार आहे.धामणगावात सेवेचा प्रारंभशहरातील युवा तंत्रज्ञ शशांक तायवाडे यांनी तयार केलेल्या या टोल फ्रÞी क्रमांक सेवेचा प्रारंभ नगराध्यक्ष प्रताप अडसड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष देवकरण रॉय, नगरसेवक हेमकरण कांकरिया, संतोष पोळ, पद्माकर पाटील, सुनील जावरकर, विनोद धुवे, शुभम किन्नाके, सीमा देवतळे, दर्शना ठाकूर, अर्चना गोडबोले, अर्चना ठाकरे, आठवले ताई, संजय जांगडा, मुख्यधिकारी सुमेध अलोणे, शशांक तायवाडे, मनीष मुंधडा, राजू पसरी, छगन जाधव, राजू चौबे, सलमान खान आदी उपस्थित होते.