शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेतील ‘टोल फ्र ी’ नंबर 'डेड'

By admin | Updated: August 2, 2016 00:15 IST

मोठा गाजावाजा करून अमरावतीकरांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा दावा फुसका बार ठरला आहे

तक्रार करायची कुठे ? : नागरिक हैराण अमरावती : मोठा गाजावाजा करून अमरावतीकरांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा दावा फुसका बार ठरला आहे. शहरातील समस्या महापालिकेपर्यंत पोहोचविण्यासाठी टोल फ्री नंबर जाहीर करण्यात आले. ते बहुतांश नंबर डेड झाले आहेत. ते पूर्ववत करण्याचा मुहूर्त पालिकेला सापडलेला नाही.शहरातील रस्ते, नाल्या, पाणी,वीज, अनधिकृत बांधकाम, अनधिकृत फलकबाजी व अन्य इतर समस्यांबाबत तक्रारी करण्यासाठी महापालिका यंत्रणेने लॅन्डलाईन क्रमांकासह टोल फ्री नंबर जाहीर केले. त्यातील १८००-२३३-६४५० हा क्रमांक वगळता फलकासंदर्भातील १८००-२३३-६४४० आणि १८००-२३३-६४४१ हे दोन्ही टोल फ्री क्रमांक वर्षभरापासून बंद आहेत. या दोन्ही क्रमांकावर संपर्क केल्यास या दूरध्वनीवरील सुविधा काही कालावधीकरीता बंद करण्यात आली आहे, असे उत्तर मिळते.अनधिकृत जाहिरातींसाठी १८००-२३३-६४४० आणि १८००-२३३-६४४१ हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध करण्यात आले होते. मात्र, दोन्ही क्रमांक बंद असल्याचे बाजार परवाना विभागाच्या गावीही नाही. याशिवाय २६७३५०१ व २५७६४६९ या दोन क्रमांकावरही अनधिकृत फलकबाजीसंदर्भातील तक्रारी नोंदविण्याचे आवाहन बाजार परवाना विभागाने केले होते. यातील २६७३५०१ हा क्रमांक बंद असून २५७६४६९ हा क्रमांक टोल फ्री नसल्याचे सांगितले जात.१८००-२३३-६४५० टोल फ्रीवरुन ढकलाढकलीमहापालिकेच्या संकेतस्थळावर १८००-२३३-६४५० टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे.या क्रमांकावर संपर्क साधला असता निव्वळ टोलवाटोलवी केली जाते. गढूळ पाणी आणि सार्वजनिक नळासंदर्भात तक्रार केली असता मजीप्राकडे जाण्याचा व महापालिकेत येऊन लेखी देण्याचा सल्ला दिला जातो. (प्रतिनिधी)नको ती तक्रार अनधिकृत होर्डिंग्ज संदर्भातील दोन्ही टोल फ्री क्रमांकासह लॅन्डलाईनही बंद असल्याने व एकमेव सुरु असलेल्या टोल फ्री वर टोलवाटोलवी केली जात असल्याने, नको ती तक्रार असे म्हणण्याची वेळ आली आहे.कुठे करायचा एसएमएस?९९७०००१३१२ या क्रमांकावर एसएमएस करुन तक्रार नोंदवा, असे आवाहन महापालिकेच्या संकेतस्थळावरुन करण्यात आले आहे. हा क्रमांक अनेक दिवसांपासून बंद झाला असताना दुसरा क्रमांक उपलब्ध करुन देण्याचा मुहूर्त पालिकेला मिळालेला नाही.