शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

टोलमुक्तीसाठी नांदगावपेठ टोल नाका कार्यालयात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 22:35 IST

टोलमुक्तीसाठी नांदगाव पेठ येथील टोलनाका कार्यालयात नागरिकांनी शनिवारी ठिय्या दिल्याने खळबळ उडाली. मोर्शी-वरुड कृती समिती, वरूड तालुक्यातील संघर्ष ग्रुप व ट्रान्सपोर्ट असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला.

ठळक मुद्देकृती समितीची मागणी : ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा आंदोलनात सहभाग

अमरावती : टोलमुक्तीसाठी नांदगाव पेठ येथील टोलनाका कार्यालयात नागरिकांनी शनिवारी ठिय्या दिल्याने खळबळ उडाली. मोर्शी-वरुड कृती समिती, वरूड तालुक्यातील संघर्ष ग्रुप व ट्रान्सपोर्ट असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला.अमरावती-नागपूर महामार्गावरील नांदगावपेठ येथे आयआरबीने टोल उभारून वसुली सुरू केली तेव्हापासून मोर्शी व वरूड येथून ये-जा करणाऱ्या वाहनांनाही टोल भरावा लागत आहे. त्यांना ९० रुपये टोलचा आर्थिक भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागत आहे. थोड्या अंतरावर जाण्यासाठीही टोल वसुल केली जात असल्याने हा अन्यायच आहे. आता टोलमुक्तीसाठी मोर्शी व वरुड येथील नागरिक एकत्रित आले असून, त्यांनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. टोलनाक्याविरोधात आतापर्यंत १० हजारांवर नागरिकांनी स्वाक्षरी केल्या आहेत. या टोलविरुद्ध अनेक ग्रामपंचायतींनी ठरावही घेतले. याबाबत नागरिकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. अनिल बोंडे यांना निवेदने देण्यात आले. मात्र, अद्याप नागरिकांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळे अखेर नागरिकांनी पुढाकार घेत शनिवारी टोलमुक्तीसाठी आंदोलन पुकारले. हे पाहून हायवे आथोरिटीचे अधिकारी कार्यालयात दाखल झाले. आंदोलनकर्ते व अधिकाºयांमध्ये चर्चा झाली. मात्र, वृत्त लिहित्तोर पुढे काय निर्णय झाला, हे कळू शकले नाही.टोलमुक्तीसंदर्भात होईस्तोवर हलके वाहन ५, तर जड वाहन १० रुपये टोल भरण्याची तयारी कृती समितीने दर्शविली आहे. या सर्व वाहनांकडून पाच ते दहा रुपयांपर्यंतचा टोल घेण्यात यावा, अशी अपेक्षा समितीला आहे.