शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी

By admin | Updated: October 24, 2016 00:08 IST

जिल्ह्यात येत्या २७ नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान...

प्रक्रिया सुरू : नामनिर्देशन अर्ज स्वीकृती २९ आॅक्टोबरपर्यंतअमरावती : जिल्ह्यात येत्या २७ नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेचे पालन करून भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केले आहे. नगरपरिषद निवडणुकीत प्रथमच नामनिर्देशन पत्रे आॅनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहेत. त्याची प्रिंट काढून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे २४ ते २९ आॅक्टोबरपर्यंत वाजेपर्यंत दाखल करता येणार आहे. २ नोव्हेंबरला प्राप्त नामनिर्देशनपत्रांची छाननी होेईल, नंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. नामनिर्देशन मागे घेण्यासाठी ११ नोव्हेंबर आहे. १२ नोव्हेंबरला उमेदवारांना चिन्हे वाटप करण्यात येणार आहे. २७ नोव्हेंबरला सकाळी ७.३० ते दुपारी ५.३० या दरम्यान मतदान करण्यात येणार आहे आणि २८ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. (प्रतिनिधी)खर्चावर राहणार प्रशासनाची नजरराज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आणि नगरपालिका दर्जानुसार नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदासाठी निवडणुकीकरिता असलेल्या खर्च मर्यादेवर आणि सादरीकरणावर प्रशासकीय नजर राहणार आहे. यात कुचराई करणाऱ्यावर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्षनगरपालिका निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज आॅनलाईन भरावे लागणार आहे. त्यामुळे उमेदवारांचा गोंधळ होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एकखिडकी योजना सुरू केली जाईल. याठिकाणी निवडणुकीसाठी आवश्यक माहिती दिली जाणार आहे.आयोगाच्या सूचनेप्रमाणे आवश्यक तयारी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून केली आहे. निवडणुकीसाठी सोमवार पासून नामनिर्देशन स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज आहे.- किरण गित्ते, जिल्हाधिकारी, अमरावती