शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँक निवडणुकीत तीन पॅनल आमने-सामने (सुधारित बातमी )

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:13 IST

अमरावती : दी अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत ४८ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांना २३ सप्टेंबर ...

अमरावती : दी अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत ४८ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांना २३ सप्टेंबर रोजी चिन्हवाटप झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडणार आहे. जिल्हा बँकेचे या निवडणुकीत सहकार व परिवर्तन तसेच किसान आघाडी असे तीन पॅनल आमने-सामने उभे ठाकले आहेत. अशातच काही अपक्षांनीही मैदानात उडी घेतल्यामुळे ही निवडणूक अधिकच रंगतदार होणार आहे.

जिल्हा बँकेच्या या निवडणुकीत २१ पैकी ४ संचालक अविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे उर्वरित १७ जागांसाठी ४८ उमेदवार मैदानात आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या उमेदवारांची यादी घोषित केली आहे. त्यानुसार २४ सप्टेंबरपासून जिल्हा बँकेच्या प्रचाराच्या रणधुमाळीला वेग आला आहे. प्रत्येक उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचून मतदानाचा जोगवा मागत आहेत. अनेक मतदारांना मत देण्यासाठी विविध प्रकारचे फंडेसुद्धा वापरले जात आहेत. जिल्हा बँकेसाठी ४ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून ५ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्व राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

बॉक्स

आठ मतदारसंघात होणार थेट लढत

१७ संचालकांपैकी महिला राखीव या मतदारसंघातून दोन संचालक निवडली जाणार आहे. त्यामुळे मैदानातील उमेदवारांची संख्या अधिक असली तरी त्यासाठीचे मतदार मात्र १६ आहेत. त्यापैकी निम्मे मतदारसंघात एकास एक लढत असून उर्वरित आठ मतदारसंघात तीन ते सहा उमेदवार मैदानात उभे ठाकले आहेत.

बॉक्स

मेळघाटचे दोन्ही मतदारसंघ सर्वात लहान

मेळघाटातील धारणी व चिखलदरा हे दोन्ही मतदारसंघ मतदारसंख्येच्या निकषात सर्वात लहान आहे. चिखलदारा सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघात केवळ १६, तर धारणी सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघात १९ मतदार आहेत. सर्वाधिक १,६८७ मतदार महिला एससी, एसटी, व्हीजे एनटी आणि ओबीसी या जिल्हाव्यापी मतदारसंघात आहेत.

बॉक्स

बबलू देशमुख दोन मतदारसंघातून

सहकार पॅनलचे नेते तथा बँकेचे माजी अध्यक्ष बबलू देशमुख हे या निवडणुकीत दोन मतदारसंघातून लढत देत आहेत. चांदूरबाजार सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघात त्यांना राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याशी सामना करावा लागणार आहे. ओबीसी संवर्गाच्या जिल्हाव्यापी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांच्याशी लढा द्यावा लागणार आहे.