शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

स्वफसवणुकीनंतर हजारोंना नाडवले

By admin | Updated: July 2, 2016 23:59 IST

नागपूर येथे भवानी ट्रेडर्सच्या संचालकांनी मल्टीलेव्हल मार्केटिंगमधून हजारो बेरोजगारांची फसवणूक केल्याचा उघड झाला होता.

मल्टीलेव्हल मार्केटिंग : सूत्रधाराची कबुलीअमरावती : नागपूर येथे भवानी ट्रेडर्सच्या संचालकांनी मल्टीलेव्हल मार्केटिंगमधून हजारो बेरोजगारांची फसवणूक केल्याचा उघड झाला होता. त्यामध्ये आरोपी उमेन्द्र जगेश्वर राय (२२) याचीही फसवणूक झाली होती. त्यानंतर त्याने अमरावतीत वैष्णवी एन्टरप्राइजेसच्या थाटत हजारो बेरोजगारांची फसवणूक करण्याचा गोरखधंदा सुरू केला. फे्रजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्यकैय्यापुरा स्थित वैष्णवी एन्टरप्राईजेसने मल्टीलेव्हल मार्केटिंगच्या माध्यमातून हजारो बेरोजगारांची फसवणूक केल्याचे नुकतेच उघड झाले आहे. याप्रकरणात अमरावती पोलिसांनी उमेन्द्र जगेश्वर राय याच्यासह त्याचा भाऊ सुरेंद्र जगेश्वर राम (२४,रा. दोन्ही राहणार भेडीया, औरंगाबाद, बिहार) व सुनील विजयसिंग गिरासे (२०,रा. धावडे, ता.शिंदखेडा, जि.धुळे) यांना अटक करून त्यांच्या कार्यालयातून ४० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांना ७ जूलैपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आता आर्थिक गुन्हे शाखा त्यांची सखोल चौकशी करीत आहे. दरम्यान चौकशीत उमेन्द्र याची नागपूरमध्ये मल्टीलेव्हल मार्केटिंगमध्येच फसवणूक झाल्याने त्याने अमरावतीत हा गोरखधंदा सुरू केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. लाखोंचा मुद्देमाल जप्तअमरावती : नागपूर शहरातील दत्तवाडी परिसरात भवानी ट्रेडर्सचे संचालक मुद्रीका प्रसाद, शिवाजी थोरात व अजित केसरी या तिघांनी मल्टीलेव्हल मार्केटिंगचा व्यवसाय सुरू करून बेरोजगारांना गंडविण्याचा गोरखधंदा सुरू केला होता. या आरोपींनी १४ संप्टेंबर २०१४ रोजी सोलापूर येथील रहिवासी सचिन किसन चव्हाण याला फोन करून कृषी विभागात नोकरी लावून देण्याचे आमीष दाखविले होते. सोबत ११ हजार रुपये घेऊन येण्याचे सांगितले होते. त्यानुसार सचिन काही बेरोजगार मित्रांना सोबत घेऊन नागपूरला गेला होता. त्यावेळी तेथे तब्बल १७ बेरोजगार मुलाखतीसाठी उपस्थित होते. त्यामध्ये अमरावतीत अटक करण्यात आलेला आरोपी उमेन्द राय सुध्दा होता. आरोपींनी या बेरोजगारांकडून ८ हजार ८०० रुपये, २ हजार खोली भाडे व २०० रुपये अर्जासाठी असे, एकूण ११ हजार रुपये घेतले. त्यानंतर बेरोजगारांना मल्टीलेव्हल मार्केटिंगसंदर्भात दोन महिन्याचे प्रशिक्षण दिले. त्यामुळे आपली फसवणूक होत असल्याचे पाहून ४ डिसेंबर २०१४ रोजी सचीन चव्हाण याने सोलापुर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. तेथून ती तक्रार वाडी पोलिसांकडे आल्यानंतर पोलिसांनी भवानी ट्रेडर्समध्ये धाड टाकून तिन्ही आरोपींना अटक केली. तेथून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. तेव्हापासून भवानी ट्रेडर्सला कुलुप लागले. मात्र, फसवणूक झालेल्या उमेंद्रच्या मनात काही वेगळीच कल्पना शिजत होती. अशाप्रकारे आपणही पैसे कमावू शकतो, या उद्देशाने उमेंद्रने अमरावतीत दाखल झाला. त्याने व्यंकैय्यापुऱ्यात भाड्याने खोली घेऊन वैष्णवी एन्टरप्राईझेस नावाने दुकानदारी सुरू केली. त्यांच्याशी हजारो बेरोजगार जुळले. मात्र, त्याचा हा धंदा अधिक काळ टिकू शकला नाही. उमेंद्रने महाराष्ट्रभरात आपल्या कंपनीचे जाळे पसरविले असून पुढील चौकशी आर्थिक गुन्हे शाखा करीत आहेत.