शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

हजारो एकरांतील उडीद पाण्याखाली

By admin | Updated: September 25, 2016 00:26 IST

दर्यापूर तालुक्यात ८ दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. परंतु सवंगणी केलेल्या उडीद पिकांचे ढीग पावसात भिजून सडत आहे.

नवे संकट : लेहेगाव परिसरातील शेतकरी चिंतेतलेहेगाव रेल्वे : दर्यापूर तालुक्यात ८ दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. परंतु सवंगणी केलेल्या उडीद पिकांचे ढीग पावसात भिजून सडत आहे. शेंगात कोंब फुटू लागले. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या परिसरात यंदा आंतरपीक म्हणून उडीद पिकाला शेतकरी वर्गाने अधिक प्राधान्य दिले. मागील वर्षी उडदाला शासनाने १० ते १५ हजार रुपये भाव दिला. त्यामुळे शेतकरी वर्गाला उडीद पिकाचे वेड लागले. परंतु यावर्षी उडीद पीक कापणीला आल्यावर आलेल्या पावसामुळे उडीद पीक संकटात सापडले. या वर्षी मात्र परिसरात उडीदाची पेरणी अधिक आहे. उत्पादन अधिक झाल्याने पिकाला भाव सुद्धा कमी आहे. ५ ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव सध्यस्थितीत आहे. सध्या उडीदाची सवंगणी सुरू आहे. मात्र पावसामुळे कापलेले पीक जमा करण्यास सवड मिळाली नाही. भिजलेल्या उडदाला कोंब फुटत आहे. परिसरातील नाचोना, खुर्माबाद, इटकी, अंतरगाव माहुली, कान्होली येथे कमी अधिक प्रमाणात उडदाची हीच स्थिती आहे. येथे मेळघाटातील मजूर काम करण्यासाठी दाखल होत असतो. सधन शेतकऱ्यांनी बाहेर गावावरुन मजूर आणून शेतीची काम करीत आहे. परंतु अल्पभूधारक शेतकरी हा पावसाच्या कचाट्यात सापडला आहे. त्यामुळे पिकावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. (वार्ताहर)