शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती : यंदाही जीव मुठीत घेऊनच विद्यार्थ्यांना घ्यावे लागणार शिक्षणाचे धडे

By जितेंद्र दखने | Updated: May 24, 2023 18:49 IST

जिल्हाभरात १८७ शाळांतील ३३२ वर्गखोल्यांचा निर्लेखनाचा प्रस्ताव

अमरावती : नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात तोंडावर आली असताना निधीअभावी नवीन शैक्षणिक सत्र २०२३-२४ मध्येदेखील शिकस्त वर्गखोल्यांचे निर्लेखन व नवीन बांधकाम झाले नसल्यामुळे यंदाही विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊनच शिक्षणाचे धडे घ्यावे लागणार आहेत. जिल्ह्यातील १४ तालुक्यांत जिल्हा परिषदेच्या १८७ शाळांमधील ३३२ वर्गखोल्या धोकादायक असून, या वर्गखोल्यांपैकी ७१ वर्गखोल्यांचा अपवाद सोडला, तर २६१ वर्गखोल्यांचे निर्लेखन करून बांधकाम अद्याप करण्यात आले नाही. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची गैरसोय होण्याची दाट शक्यता आहे.

खासगी शाळेचे लाेण वाढले असले तरी ग्रामीण व दुर्गम भागापर्यंत फारसे पोहोचले नाही. त्यामुळे ग्रामीण भागात व विशेषत: मेळघाटातील दुर्गम भागातील नागरिक अजूनही आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेचाच आधार आहे. जिल्हा परिषदेच्या ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी त्या शाळांमध्ये शिक्षकांची पदे पूर्ण भरलेली आणि ज्या शाळांमध्ये मुलांची संख्या जास्त आहे त्या शाळेतील शिक्षकांची पदे रिक्त व कमी असा विरोधाभास पाहावयास मिळतो.

यासोबतच ग्रामीण भागातील शाळांची अवस्थादेखील बिकट आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील १८७ शाळांतील ३३२ खोल्या धोकादायक बनल्या आहेत. तसा अहवाल शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषद प्रशासनाला दिला आहे. या वर्गखोल्या दुरुस्तीसाठी निधी लागणार आहे. तसा प्रस्ताव देण्यात आला आहे; परंतु अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. नवीन शैक्षणिक वर्षातदेखील धोकादायक वर्गखोल्यांमध्ये शिक्षण घ्यावे लागणार आहे.तालुकानिहाय धोकादायक वर्गखोल्याअचलपूर २६, अमरावती २०, अंजनगाव सुर्जी ३४, भातकुली १०, चांदूर बाजार २६, चिखलदरा ११, चांदूर रेल्वे १२, दर्यापूर ४६, धारणी ४१, धामणगाव रेल्वे १४, मोर्शी १५, नांदगाव खंडेश्वर २८, तिवसा ०३, वरूड ४६ एकूण ३३२बांधकामकडून ७१ वर्गखोल्यांचे निर्लेखनजिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून शिकस्त वर्गखोल्यांचे निर्लेखनाचे प्रस्ताव बांधकाम विभागाकडे सादर केलेले आहेत. ३३२ वर्गखोल्यांपैकी ७१ खोल्यांच्या निर्लेखनास बांधकाम विभागाकडून पूर्वपरवानगी मिळाली आहे. याशिवाय ११६ परवानगी अद्याप मिळालेली नाही.गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून शिकस्त वर्गखोल्यांचे प्रस्ताव शिक्षण विभागाने बांधकाम विभागाकडे निर्लेखनाच्या परवानगीसाठी पाठविले आहेत. या प्रक्रियेसोबतच नवीन बांधकामाकरिता शिक्षण विभागाचा पाठपुरावा सुरू आहे. निकडीने कामे प्राधान्याने घेतली आहेत. याशिवाय इतर वर्गखोल्यांची कामे करण्याच्या अनुषंगाने पत्रव्यवहार सुरू असून, निधी उपलब्ध होताच ही कामे केली जातील.प्रिया देशमुख, शिक्षणाधिकारी प्राथमिक

टॅग्स :Amravatiअमरावती