शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

तिसरी मुलगी झाल्याने अर्भक पुरले जमिनीत

By admin | Updated: July 30, 2016 23:57 IST

वलगाव ठाण्याच्या हद्दीतील रामा गावात १० जुलै रोजी स्त्री अर्भक जमिनीत पुरल्याची घटना उघडकीस आली.

रामा येथील घटना : आई-वडिलांची निर्दयताअमरावती : वलगाव ठाण्याच्या हद्दीतील रामा गावात १० जुलै रोजी स्त्री अर्भक जमिनीत पुरल्याची घटना उघडकीस आली. त्यामध्ये निर्दयी आई-वडिलांनी तिसरीही मुलगी झाल्यामुळे गर्भपात केला आणि स्त्री अर्भक जमिनीत पुरल्याची धक्कादायक माहिती हाती लागली. अद्यापपर्यंत पोलिसांनी आरोपीला अटक केली नसून दोन दिवसांत आरोपी अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.शासनातर्फे मुलींची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मुलींची हत्या थांबविण्याचे जनजागृती केली जात आहे. मात्र, आजही काही निर्दयी आई-वडिल आपल्या जन्मजात मुलींची हत्या करीत आहे. अशीच घटना १० जुलै रोजी रामा गावात उघडकीस आली. तेथील रहिवासी सुधाकर पंजाब जुनघरे यांच्या मालकीच्या मोकळ्या जागेत काही श्वान स्त्री अर्भकाचे लचके तोडत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यानुसार नागरिकांनी पोलीस पाटील नितीन बबन तेलखेडे यांना माहिती दिली होती. त्यांनी घटनास्थळी जाऊन बघितले असता ८ ते ९ महिन्याचे स्त्रि अर्भक हे अर्धा फूट जमीन खोदून पुरण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले.सदर स्त्री अर्भक रामा गावातील असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. तिसरी मुलगी झाली म्हणून गर्भपात करून ते अर्भक जमिनीत पुरण्यात आले. याप्रकरणात पुढील कारवाई करण्यात येईल. - एस. पी. सोनवणे,पोलीस निरीक्षक, वलगाव ठाणे