शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

-आता चोरट्यांचे लक्ष्य दागिने आणि मोबाईल !

By admin | Updated: November 16, 2016 00:11 IST

पाचशे व हजारांच्या नोटा चलनातून बाद झाल्यामुळे चोरटेही सतर्क झाल्याचे दिसून येत आहेत.

चोरांचा नवा फंडा : पाचशे-हजारांच्या नोटांकडे पाठ अमरावती : पाचशे व हजारांच्या नोटा चलनातून बाद झाल्यामुळे चोरटेही सतर्क झाल्याचे दिसून येत आहेत. याचा अर्थ चोरीच्या घटना कमी झाल्यात असे नाही तर आता चोरटे दागिने आणि मोबाईलला लक्ष्य करीत आहेत. मागील काही दिवसांत घडलेल्या चोरीच्या घटनांमध्ये दागिन्यांसह मोबाईल चोरीच्या सर्वाधिक घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे मागील पाच दिवसांमध्ये आयुक्तालय क्षेत्रातील चोरीच्या घटनांवर दृष्टीक्षेप टाकल्यास ही बाब प्रकर्षाने जाणवते. दोन दिवसांपूर्वी राजापेठ ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या १.८८ लाखांच्या धाडसी घरफोडीतही चोरट्यांनी रोख रकमेऐवजी सोन्या-चांदीच्या दागिन्यावर डल्ला मारला. ८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व हजारांच्या नोटा चलनातून रद्द केल्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संपूर्ण देश एका वेगळ्या स्थित्यंतरातून जात आहे. पंतप्रधानांच्या नोटाबंदीच्या धक्कातंत्राने एकीकडे संपूर्ण देश हादरला असताना चोरटेही सतर्क झाले आहेत. आतापर्यंत चोरटेकेवळ रोकडच लंपास करीत होते. मात्र, पाचशे व हजारांच्या नोटा चोरल्यानंतर त्याबँकेत नेऊन बदलायच्या कशा, असा प्रश्न चोरट्यांना कदाचित पडला असावा आणि त्यामुळेच की काय, त्यांनी रोख रकमेऐवजी सोन्या-चांदीच्या दागदागिन्यांना लक्ष्य केले आहे. पोलीस आयुक्तालयाच्या ‘डेली क्राईम रिपोर्ट’मधून ही बाब उघड झाली. या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर नागरिकांनीही घरात नोटा ठेवणे बंद करणे, हे यामागचे एक कारण असू शकते. शहरातील बहुंताश नागरिक सध्या नोटा बँकेत जमा करण्यात व एक्सचेंज करण्यात मग्न आहेत. अनेक जण घराला कुलूप लाऊन नोटा जमा करण्यासाठी जात आहेत. यासंधीचा लाभ घेऊन चोरट्यांनी शहरात डझनावर चोऱ्या केल्या आहेत.