शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

हे रेल्वेचे आरक्षित डबे आहेत की कोंबून भरलेली काही-पिवळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:13 IST

अमरावती : कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दीड वर्षांपासून रेल्वे लोकल आणि पॅसेंजर गाड्या अद्यापही सुरू केल्या नाही. केवळ विशेष गाड्या ...

अमरावती : कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दीड वर्षांपासून रेल्वे लोकल आणि पॅसेंजर गाड्या अद्यापही सुरू केल्या नाही. केवळ विशेष गाड्या सुरू असून या गाड्यांमध्ये तिकीट आरक्षित केल्याशिवाय प्रवास करता येत नाही. त्यामुळे विशेष गाड्यांमधील आरक्षित डब्यांमध्ये प्रचंड गर्दी वाढली असून, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची पूर्णपणे ऐशीतैशी झाली आहे. आरक्षित डब्यांमधील गर्दी पाहता हे खरोखरच आरक्षित डबे आहेत की कोंबून भरलेली काळी-पिवळी, हे समजण्यास मार्ग नाही.

हावडा-मुंबई मार्गावरील बडनेरा रेल्वे स्थानक हे एक प्रमुख स्थानक असून, या स्थानकावरून सद्यस्थितीत दररोज ४२ गाड्या धावत आहेत, तर ८ ते १० हजारांवर प्रवासी दररोज ये-जा करीत आहेत.

अमरावतीचे प्रवेशद्वार म्हणून बडनेरा रेल्वे स्थानक आहे. मेळघाट, मुक्तगिरी येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक, भाविक येतात. अमरावती येथे अंबादेवी, एकवीरा देवीच्या दर्शनासाठीसुद्धा भक्तांची या रेल्वे स्थानकावर सातत्याने प्रवाशांची वर्दळ असते. मागील दीड वर्षापासून लोकल आणि पॅसेंजर गाड्या बंदच आहेत. त्यामुळे प्रवाशांना विशेष गाड्यांमध्ये आरक्षण करूनच प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे आरक्षित डब्यातील गर्दीत प्रचंड वाढ झाली आहे. काळी-पिवळी वाहनात जसे प्रवासी कोंबून भरले जातात. तशीच स्थिती आरक्षित डब्यांची झाली आहे.

बाॅक्स

सर्वच गाड्यांत सारखीच स्थिती

लोकमत प्रतिनिधीने शुक्रवारी बडनेरा रेल्वे स्थानकाला भेट देऊन महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या आरक्षित डब्यांची पाहणी केली असता त्या डब्यांमध्ये प्रचंड गर्दी होती. त्यामुळे हा आरक्षित डबा आहे की नाही, हे कळायला मार्ग नव्हता. गीतांजली, गरीबरथ एक्स्प्रेस, हावडा-अहमदाबाद, आझाद हिंद एक्स्प्रेस या सर्वच गाड्यांची स्थिती एकसारखीच दिसली. या डब्यातील अनेक प्रवाशांनी मास्कसुद्धा लावले नव्हते. तर कोरोना प्रतिबंधात्मक नियम पूर्णपणे धाब्यावर बसविल्याचे चित्र होते.

---------------

बाॅक्स

डब्यांमध्ये विक्रेत्यांची अधिक गर्दी

सध्या केवळ विशेष आणि काही मोजक्याच गाड्या सुरू आहेत. या गाड्यांमध्ये खाद्यपदार्थ, पुस्तके व इतर किरकोळ सामानाची विक्री करुन अनेक छोट्या विक्रेत्यांचा रोजगार चालतो. लोकल आणि पॅसेंजर गाड्या बंद असल्याने सुरु असलेल्या गाड्यांमधील आरक्षित डब्यांमध्ये विक्रेत्यांची सर्वाधिक गर्दी दिसून येत आहे.

कोट

बोर्डाच्या आदेशाची प्रतीक्षा

लोकल आणि पॅसेंजर गाड्या सुरु करण्यासंदर्भात रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव तयार करुन पाठविण्यात आला आहे. त्यांची मंजुरी मिळाल्यानंतर या गाड्या सुरु करण्यात येतील. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने गाड्यांमधील गर्दी वाढली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याच्या सूचनादेखील प्रवाशांना केल्या जात आहे.

-जनसंपर्क अधिकारी, रेल्वे