शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

विनाअनुदानित शाळांना २० टक्के अनुदानाचा ‘जीआर’ अद्यापही नाही

By admin | Updated: September 14, 2016 00:21 IST

राज्यातील विनाअनुदान तत्त्वावर तसेच कायम अनुदान तत्त्वावर परवानगी दिलेल्या व मूल्यांकनदरम्यान अनुदानास पात्र ठरलेल्या...

शिक्षकांमध्ये नैराश्य : शिक्षक संघटनांमध्ये फूट !अमरावती : राज्यातील विनाअनुदान तत्त्वावर तसेच कायम अनुदान तत्त्वावर परवानगी दिलेल्या व मूल्यांकनदरम्यान अनुदानास पात्र ठरलेल्या मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना सरसकट २० टक्के अनुदान देण्याचा निर्णय १२ दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला नसल्याने विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.गत पावसाळी अधिवेशनात गणेशोत्सवापूर्वी विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्रीे विनोद तावडे यांनी दिले होते. त्यानुसार विनाअनुदानित शाळांना २० टक्के अनुदान जाहीर करण्यात आले. मात्र गणेशोत्सवात शाळांच्या खात्यात हे अनुदान पडले नाही. याविषयी कार्यवाही जलद गतने होत नसल्याने शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षणमंत्र्यांनी गणेशोत्सवापूर्वी वेतानाचा मुद्दा सुटला नाही तर माझे विसर्जन करा, असे शिक्षकांच्या शिष्टमंडळाला म्हटले होते. घरगुती गणेशाचे विसर्जन झाले. येत्या दोन दिवसांत सार्वजनिक गणेशाचे विसर्जन केले जाणार असले तरी २० टक्के अनुदान देण्यासंदर्भात शासन निर्णय निघाला नसल्याने शिक्षकवृंद संभ्रमावस्थेत आले आहे. नेमके मंत्रिमंडळाने कोणता निर्णय घेतला, हे एकदाचे जाहीर करा, अशी मागणी होऊ लागली आहे. यासंदर्भात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विनाअनुदानित शिक्षकांची बोळवण करू नका, असा प्रहार केला आहे. २९ आॅगस्ट रोजी २० टक्के अनुदानाचा जो निर्णय शासनाने घोषित केला, त्यात घोषित शाळांसाठी हा निर्णय असल्याचे म्हटले आहे. हा निर्णय विनाअनुदानित शाळांसाठी का नाही, असा सवाल संजय खोडके यांनी उपस्थित केला आहे. घोषित, अघोषित आणि घोषित होणाऱ्या शाळा अशी वर्गवारी करून शासन शाळांमध्ये आपसात भांडणे लावून संघटनेत फूट पाडण्याचे कटकारस्थान रचत असल्याचा आरोप संजय खोडके यांनी केला आहे. शासनाला जर विनाअनुदानित शाळांना न्याय द्यायचा असेल तर ‘जीआर’ का काढत नाही, असा सवालही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. (प्रतिनिधी)विनाअनुदानित शाळांना २० टक्के अनुदान घोषित करण्यात आले असले तरी यात शासनाने दुरुस्ती करण्याचे ठरविले आहे. शिक्षकांवर अन्याय होऊ देणार नाही. प्रसंगी पुन्हा रस्त्यावरची लढाई लढू.- शेखर भोयर,संस्थापक अध्यक्ष, शिक्षक महासंघराज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक १६ सप्टेंबर रोजी होईल. यात मागील इतिवृत्त मंजूर केले जाईल. त्यानंतर २० टक्के अनुदानाचा ‘जीआर’ची प्रक्रिया सुरू होईल. या महिन्याअखेर ‘जीआर’ निघेल, अशी शक्यता आहे.- संजय खोडके,प्रदेश सरचिटणीस, काँग्रेस