शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

धम्मकार्यासाठी कोणत्याही न्यायालयाची अडचण नाही

By admin | Updated: December 24, 2015 00:16 IST

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनंतर त्यांचे पुत्र भय्यासाहेब आंबेडकर यांनीच भारतीय बौध्द महासभेच्या माध्यमातून देशभर धम्मदीक्षेचे कार्यक्रम आयोजित केले.

भीमराव आंबेडकरांचे प्रतिपादन : दर्यापुरात जाहीर सभादर्यापूर : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनंतर त्यांचे पुत्र भय्यासाहेब आंबेडकर यांनीच भारतीय बौध्द महासभेच्या माध्यमातून देशभर धम्मदीक्षेचे कार्यक्रम आयोजित केले. काही निकाल जरी न्यायालयाचे महासभेच्या विरोधात गेले असले तरी धम्मकार्य करण्यासाठी कोणत्याही न्यायालयाची अडचण येणार नाही, असे प्रतिपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे व्दितीय नातू भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी केले. ते दर्यापूर येथे आयोजित सभेत बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, न्यायालयीन निकालाचा आदर आहे. पण तरीही धम्म कार्य करून सुसंस्कार समाज निर्मितीच्या कार्यास कुणीही थांबू शकणार नाही. त्यासाठी कोणत्याही न्यायालयाची अनुमतीची गरज नसून भगवान बुध्द व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनमाणसात रुजविण्यासाठी अहोरात्र कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय बौध्द महासभा दर्यापूर शाखेच्यावतीने रविवारी स्थानिक जिल्हा परिषदेच्या मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी विजय जामनिक होते. प्रमुख अतिथी म्हणून एम.डी. सरोदे, रवी भगत, एम.पी. वालोंद्रे, विजय चोरपगार, लक्ष्मी सराटे, शोभा वानखडे, राहुल आठवले, संतोष कोल्हे, पी.टी. खंडारे, एम.पी. निताळे, बुध्दाजी रायबोले, नरेंद्र जामनिक, आर.एम. भट्टड आदींची उपस्थिती होती. यावेळी एम.डी. सरोदे व रवी भगत यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी बोलताना विजय चोरपगार म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म चळवळ वाढविण्यासाठी मोलाचे कार्य केले. आज त्यांचा विचार घेऊन आम्ही चालत आहे. संचालन एस.एस.डोंगरे, प्रास्ताविक विजय चोरपगार व आभार मुरलीधर रायबोले यांनी मानले. सभेला असंख्य आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)