शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

बहुजनांच्या उत्थानासाठी झटणारी माणसे उरली नाहीत

By admin | Updated: April 11, 2015 00:08 IST

समाज हा कर्तबगार पुरुषांच्या कर्मावर उभा असतो. ..

भाऊसाहेबांची पुण्यतिथी : बाबा भांड यांचे प्रतिपादनअमरावती : समाज हा कर्तबगार पुरुषांच्या कर्मावर उभा असतो. दुर्दैवाने आज बहुजनांच्या उत्थानासाठी झटणारी माणसे उरली नाहीत. ज्या महापुरुषांनी बहुजनांच्या कल्याणासाठी काम केले अशांचा इतिहास आपण वाचला पाहिजे. बहुजनांच्या आपापसातील भांडणामुळेच त्यांची प्रगती खुंटल्याची खंत ज्येष्ठ लेखक तथा विचारवंत बाबा भांड (औरंगाबाद) यांनी व्यक्त केली.श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्यावतीने आयोजित शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ५० व्या पुण्यतिथी सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण शेळके तर प्रमुख अतिथी म्हणून सुनील देशमुख, महापौर चरणजित कौर नंदा, उषाताई देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी विचारपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, वसंतराव चर्जन, डॉ. सुरेश ठाकरे, कोषाध्यक्ष हरिहर ठाकरे, कार्यकारिणी सदस्य एम.के. नाना देशमुख, जगन्नाथ वानखडे, नरेशचंद्र ठाकरे, सचिव प्राचार्य वि.गो. भांबूरकर, स्विकृत सदस्य प्राचार्य डॉ.वि.गो. ठाकरे, प्रा. अरविंद मंगळे, प्राचार्य अरुण सांगोळे, आर.आर. सावरकर व ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक राज दत्त यांची उपस्थिती होती. यावेळी संस्थेच्या ज्येष्ठ सदस्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्यावतीने बांधण्यात अलेल्या कस्तुरबा कन्या शाळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन उषाताई देशमुख यांनी केले. प्रास्ताविक उपाध्यक्ष वसंतराव चर्जन, संचालन किशोर फुले व आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव प्राचार्य वि.गो. भांबुरकर यांनी केले. कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. पंजाबराव उपाख्य बाऊसाहेब देशमुख यांच्या जीवनावर प्रकाश टाकला गेला.