शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

३३ उपकेंद्रांत आरोग्य वैद्यकीय अधिकारीच नाही

By admin | Updated: September 3, 2014 23:02 IST

जिल्ह्यातील ३३ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तसेच आरोग्य केंद्रांना सक्षम आरोग्य अधिकारी नसल्याची धक्कादायक माहिती आहे़ एकीकडे जिल्ह्यात मलेरिया, डेंग्यू या आजाराने डोके वर काढले असताना दुसरीकडे

मोहन राऊ त - धामणगाव रेल्वेजिल्ह्यातील ३३ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तसेच आरोग्य केंद्रांना सक्षम आरोग्य अधिकारी नसल्याची धक्कादायक माहिती आहे़ एकीकडे जिल्ह्यात मलेरिया, डेंग्यू या आजाराने डोके वर काढले असताना दुसरीकडे वैद्यकीय अधिकारी नसल्याने ग्रामीण भागात असंतोष पसरला आहे़ जिल्ह्यात ५६ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत़ या केंद्रातून आरोग्यविषयक सुविधा परिसरातील नागरिकांना पुरविण्यात येते़ परंतु या विभागाचा सर्वाधिकार पुणे येथील आरोग्य संचालक व अकोला येथील उपसंचालकाकडे आहे़ जिल्हा नियोजन समितीतून औषधी खरेदीसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो़ मात्र, आरोग्य केंद्राला औषधी खरेदी करण्याचा अधिकारही संचालक व उपसंचालकांकडे आहे़ आरोग्य संचालक तथा उपसंचालक यांच्याकडून थेट औषधी खरेदी होत असल्याने निकृष्ट दर्जाच्या औषधींचा पुरवठा होत आहे़एमबीबीएस डॉक्टर येण्यास इच्छुक नाहीतपंचायत राज समितीत सर्वाधिकार जिल्हा परिषदेकडे आहे़ ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी या संस्थेकडे असताना आरोग्य विभागाच्या भरतीची तथा एखाद्या अधिकाऱ्याच्या बदलीचा अधिकार थेट आरोग्य संचालकाला आहे़ जिल्ह्यातील १२ तर एमबीबीएस व २२ बीईएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत़ आदिवासी भागात वैद्यकीय सेवा परिपूर्ण देण्याचे आदेश थेट सर्वोच्च न्यायालयाने दिले. या भागात एकही वैद्यकीय अधिकाऱ्यांची जागा रिक्त ठेवू नये, असे आदेशात नमूद असतानाही मेळघाटातील रिक्त जागा भरण्यात आलेल्या नाहीत़ जिल्हा परिषद बनली नामधारीशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आरोग्यसेवा खिळखिळी झाली आहे़ आरोग्य विभाग सांभाळण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची वर्णी लावली जाते़ यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांना सांगितले जाते़ परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांची तक्रार आल्यास कोणतीही कारवाई करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेला नाहीत़ एमबीबीएस डॉक्टरांच्या जागा भरण्याचे अधिकार मंत्रालयाला आहेत़ यापूर्वी बीईएमएस डॉक्टरांची भरती करण्याचे अधिकारी जिल्हा परिषदेला होते़ परंतु सन २००२ पासून हे अधिकार काढून घेण्यात आले आहे.त्यामुळे आता जिल्हा परिषद केवळ नामधारी असल्याचे चित्र पहायला मिळत आहे़