शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

बेलज येथे २५ झोपड्या उडाल्या

By admin | Updated: June 7, 2014 00:41 IST

शुक्रवारी सायंकाळी ४.३0 च्या सुमारास अचानक आलेल्या वादळी पावसाने जिल्हाभरात

जिल्हाभरात वादळी पाऊस :  झाडे उन्मळली, वीजपुरवठा खंडितअमरावती :  शुक्रवारी सायंकाळी ४.३0 च्या सुमारास अचानक आलेल्या वादळी पावसाने जिल्हाभरात धुमाकूळ घातला. ठिकठिकाणी घरे, दुकानांची  हानी झाल्याची माहिती आहे. चांदूरबाजार तालुक्यातील बेलज येथे चक्रीवादळाने  २५ घरांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. शुक्रवारी दुपारपर्यंत उन्हाचा पारा कायम असताना अचानक सायंकाळी वातावरणात बदल होऊन आलेल्या चक्रीवादळामुळे बेलज या पुनर्वसित  गावाला चांगलाच तडाखा बसला. गावातील २५ घरांची मोठय़ा प्रमाणात पडझड झाली. छतावरील टीनपत्रे उडाली. याशिवाय गावातील आठ विजेचे  खांब कोसळले. यामुळे अनेक घरातील टीव्ही संचांचे नुकसान झाले. वादळात उत्तम इंगळे नामक इसम गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ  चांदूरबाजार येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ग्रामपंचायत कार्यालयात आश्रयअमरावती : उघड्यावर आलेल्या कुटुंबांना तात्पुरत्या स्वरूपात ग्रामपंचायत कार्यालयात आश्रय देण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच चांदूरबाजार तहसीलचे नायब तहसीलदार चव्हाण, गटविकास अधिकारी तुकाराम टेकाडे मंडळ अधिकारी गजेंद्र मानकर हे  बेलज गावात पोहोचले असून ते चक्रीवादळग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. प्रशासनातर्फे या कुटुंबांची राहण्याची व जेवण्याची  व्यवस्था करण्यात आली आहे. अचानक आलेल्या या संकटाने बेलज गावात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यासह शहरातही नुकसान जिल्हयासह शहरात वादळी पावसाने कहर केला आज उष्णतामान ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असताना सायंकाळच्या सुमारास पडलेल्या  पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. चक्रीवादळामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली.  (प्रतिनिधी)