अमरावती : काट आमला येथील शेतातून १० हजार रुपये किमतीची पाण्याची मोटार अज्ञात आरोपीने चोरून नेल्याची घटना २७ नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुररुवारी गुन्हा नोंदविला. फिर्यादी अतुल ओमप्रकाश नाचनकर(३२, रा. काटआमला) यांनी बडनेरा ठाण्यात तक्रार नोंदविली.
-----------------------------------------------------
स्वीपर कॉलनीत महिलेचा विनयभंग
अमरावती : जुन्या वादातून महिलेच्या घरात शिरून तिचे टी-शर्ट ओढून विनयभंग केल्याची घटना स्वीपर कॉलनीत गुरुवारी घडली. संदीप किसन पासरे(२८, रा. स्वीपर कॉलनी), असे आरोपीचे नाव आहे. फ्रेजरपुरा पोलिसांनी त्याच्याविरोधात भादंविचे कलम ३५४,३५४(अ) अन्यवे गुन्हा नोंदविला.
----------------------------------------------
मुलीला पळविले
अमरावती : मोर्शी मार्गावरील एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीला त्याच कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका मुलाने दुचाकीवर बसवून पळून नेल्याची घटना गुरूवारी गाडगेनगर ठाणे हद्दीत घडली.मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून एका युवकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
---------------------------------------------------
दुचाकी अपघातात इसम जखमी
अमरावती : दुचाकी भरधाव चालवून युवकाला धडक दिल्याने या अपघातात फिर्यादीच्या पायाला इजा झाल्याची घटना आर्यन ऑप्टिकलसमोर २८ ऑक्टोबर रोजी घडली. याप्रकरणी शुक्रवारी गाडगेनगर पोलिसांनी एमएच २७ बीडी ९३०२ च्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला. फिर्यादी संदीप शंकरदयाल जयस्वाल (३८, रा. अंबापेठ) यांनी तक्रार नोंदविली आहे.
------------------------------------------------------
दुचाकी अपघातात उपचारादरम्यान इसमाचा मृत्यू
अमरावती : दुचाकीला अन्य दुचाकीची धडक लागल्याने एक इसम जखमी झाल्याची घटना वलगाव ठाणे हद्दीत शिराळा ते बोराळा मार्गावर ११ नोव्हेंबर रोजी घडली. त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने याप्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध भादंविचे कलम २७९, ३३८, ३०४(अ) सहकलम १३४ मोटार वाहन कायदानुसार गुन्हा नोंदविला. आरोपी घटनास्थळावरून पळून गेला होता.