शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

थॅलेसेमीया ठरतोय जीवघेणा आजार

By admin | Updated: May 8, 2016 00:14 IST

थॅलेसेमीया हा अनुवांशिक एक आजार आहे. या आजारामध्ये रुग्णांची शरीरात हिमोग्लोबीन चे प्रमाण अस्थिर राहते.

जागतिक थॅलेसेमीया दिन : इर्विनच्या 'डे केअर सेंटर'मध्ये मोफत उपचारअमरावती : थॅलेसेमीया हा अनुवांशिक एक आजार आहे. या आजारामध्ये रुग्णांची शरीरात हिमोग्लोबीन चे प्रमाण अस्थिर राहते. हिमोग्लोबीनमधील अल्फा आणि बिटा चेनच्या रचनेमध्ये दोष असतो लाल रक्त पेशीचा नाश लवकर होतो. त्यामुळे हिमोग्लोबीन खुब कमी होते. हा त्रास रुग्णांला नेहमी असतो. त्यामुळे वारंवार रक्त संक्रमण करावे लागते. ज्यामुळे रुग्णांचे जीवन हे रक्तावर अवलंबून असते. जर रुग्णांनी नियमीत रक्त संक्रमण घेतले नाही तर त्यांचे जीवन कठीण होते.थॅलेसेमीयाचे दोन प्रकार थॅलेसेमीया मायनर : थॅलेसेमीया मायनर आजार असणाऱ्या व्यक्ती या पूर्णपणे निरोगी असतात. त्याच्या दैनंदिन जीवनात कोणतीही अडचण नसते. त्याला कोणत्याही प्रकारचा थकवा जागवत नाही. कुठलाही त्रास होत नाही. परंतू हा आजार असणाऱ्या व्यक्ती थॅलेसिमीया या आजाराने वाहक असतात. प्रत्येक व्यक्ती स्वत:ला निरोगी समजतो, थॅलेसेमीया आजराची आजाराची माहिती सुध्दा त्याला राहत नाही. व कोणीही थॅलेसेमीया मायनर असण्याची शक्यता असू शकते. दोन थॅलेसेमीया मायनर व्यक्तींचे लग्नामधून होणाऱ्या अपत्यांना थॅलेसेमीया मेजर आजार होण्याची शक्तता असते. त्यामुळे मुलांना वारंवार रक्त संक्रमन करावे लागते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने थॅलेसेमीया आजाराची तपासणी करणे आवश्यक आहे ही तपासणी डे केअर युनिट, हिमॉटोलॉजी विभाग, सामान्य रुग्णांलय अमरावती येथे मोफत केल्या जाते.ज्या रुग्णांना पानथडीचा आकार मोठा झाला असेल अशा रुग्णांची शस्त्रक्रिया करुन वाढलेली पानथडी काढल्या जाते.उपचार करण्यासाठी बोनमॅरो ट्रांसप्लांट ही प्रक्रीया केली जाते. ही प्रक्रिया महाग असल्याने अनेक रुग्ण करु शकत नाही. इर्विन रुग्णालयात मोफत उपचार केला जातो. रक्त संक्रमण मोफत देण्यात येते. त्यामुळे रुग्णांना होणारा त्रास कमी होतो.डे केअर युनिट, हिमॉटोलॉजी विभागांतर्गत याची मोफत तपासणी केली जाते.संकलन : मनोज सहारेडे केअर युनिट, हिमॉटोलॉजी विभाग, सामान्य रुग्णालय, अमरावती.थॅलेसेमीयावर उपचारथॅलेसेमीया हा अनुवांशिक आजार असून या आजारावर कुठलाही उपचार नाही. पण वारंवार रक्त संक्रमण करावे लागत असल्याने त्यांच्या शरीरात लोहाचे प्रमाण वाढते. शरीरात लोहाचे प्रमाण अधिक न वाढावे यासाठी त्यांना टॅब, डेसीरोक्स, कॅप.केलफर या औषधी देवून त्याच्या शरीरात लोहाचे प्रमाण स्थिर ठेवता येते.थॅलेसिमीया आजाराची लक्षणेवयाच्या ६ व्या महिन्यापासून दिसायला सुरुवात होते.त्यात बाळाचे हिमोग्लोेबीन झपाटयाने कमी व्हायला सुरुवात होते. बाळचा रंग पांढरा पडायला सुरुवात होते.बाळ नियमीत आहार घेत नाही.चिडचिड व रडत राहतो.बाळाचे पोट फुगलेले दिसते.शारीरिक व मानसिक वाढ खुंटते.प्रतिबंध उपायउंच ठिकाणी जाणे टाळणेनियमीत आहार घेणेनियमतीत आराम करणे.पाणी भरपूर प्रमाणात प्यावे.शरीराला अधीक प्रमाणात कुठल्याही प्रकारे थकवा जाणवणार नाही असे काम करु नये.नियमीत साधारण व्यायाम करणेनित्यनियमाने एच. बीची तपासणी करत राहाणे.