अमरावती : दहावींच्या विद्यार्थ्यांसाठी फेब्रुवारीत आॅनलाईन कल चाचणी होणार आहे. संबंधित विद्यार्थी डॉक्टर होऊ शकते, वकील होऊ शकतो की अभियंता याची तपासणी घेणारी चाचणी राहणार आहे. यासाठी जिल्हा परिषद माध्यमिक विभागाने तयारी सुरू केली आहे. याबाबत गुरूवारी शिक्षण मंडळात बैठक सुध्दा पार पडली आहे.मार्चमध्ये लेखी परीक्षेला सामोरे जाताना आता आणखी एका आणखी एका चाचणीत विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागणार आहे. या चाचणी मागील हेतू चांगला असला तर शेवटच्या टप्प्यातील अभ्यासाच्या घाईगडबडीत विद्यार्थी कितपय परीक्षा क्षेत्रात हे पाहावे लागेल. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन परीक्षा न घेता त्याची आवड पालकांनी ध्यानात घ्यावी आणि त्यानुसार अभ्यासक्रम निवडण्याची मुभा द्यावी या साठी ही कल चाचणी होत आहे. चाचणी आॅनलाईन असेल. परत परीक्षेचा नमुना बनविण्याचे काम सध्या सुरु आहे. सर्व शाळांत दहावींच्या विद्यार्थ्यांचे वर्ष संपत आहे. जानेवारीत अभ्यासासाठी मोकळीक कशी मिळेल यासाठी प्रयत्न सुरु असतात. आता कल चाचणी साठी विद्यार्थ्यांना स्वतंत्र तयारी करावी लागणार आहे. प्रश्नपत्रिका किती गुणांची असेले हे अद्याप निश्चित नाही. एकाच वेळी ही परीक्षा होणार का याबाबतची संभ्रमावस्था आहे. (प्रतिनिधी)
दहावी विद्यार्थ्यांसाठी कल चाचणीची तयारी सुरू
By admin | Updated: December 13, 2015 00:10 IST