शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

चांदूरबाजारात तणाव

By admin | Updated: January 24, 2015 00:05 IST

जनवरे नेणारे वाहन नेताजी चौकातून जात असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिली. क्षमतेपेक्षा अधिक जनावरे वाहून नेणारे वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले.

सुरेश सवळे चांदूर बाजारजनवरे नेणारे वाहन नेताजी चौकातून जात असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिली. क्षमतेपेक्षा अधिक जनावरे वाहून नेणारे वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले. वाहन चालकावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी २.३० च्या सुमारास स्थानिक नेताजी चौकातून वाहनात कोंबून जनावरे नेत असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिली. ठाणेदार डी.बी. तडवी ताफ्यासह घटनास्थळावर दाखल झाले व त्यांनी वाहन ताब्यात घेऊन चालकावर कारवाई केली. बोलेरो कंपनीचा मालवाहू मेटॅडोर क्रमांक एमएच २७ जे ४२३ यात १० जनावरे नेण्यात येत होती. वाहन मालकाचे नाव अजय पाटेकर असुन ही जनावरे ईशाद कुरेशी यांच्या मालकीची असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. वाहनचालक सुशील पुरुषोत्तम लालतिवारी (वय ४६) यांचेवर प्राण्यांना निर्दयी वागणूक देण्यासंबंधी कलम ११(१) (क) (ड) (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून जनावरांना कोंडवाड्यात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणाची कारवाई सुरु असतानाच लोकांनी आपसात वादावादी झाल्यामुळे पोलीस ठाण्यात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी जमाव पांगविल्यामुळे पुढील अनर्थ टळला. उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण पौनीकर यांच्या नेतृत्वात परतवाडा, अचलपूर, आसेगाव, शिरजगाव कसबा व चांदूरबाजारची पोलीस कुमक परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. याच्या दिमतीला दंगा नियंत्रण पथकाच्या दोन तुकड्या बोलावाल्या असून संवेदनशील भागात तैनात केले आहेत. पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांना घटनेची माहिती मिळताच तेदेखील परिस्थितीवर लक्ष केंद्रित करुन आहेत. शहर व परिसरात मात्र सध्या शांतता आहे.