शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

दहा वर्षांपूर्वीही आश्रमात मुलाचा संशयास्पद मृत्यू !

By admin | Updated: September 15, 2016 00:08 IST

शंकर महाराज हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या पिंपळखुटा येथील आश्रमात दहा वर्षांपूर्वीही एका मुलाचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याची माहिती शोधमोहिमेत पुढे आली आहे.

घाडगेंचे अभय ? : प्रथमेशला धोका असल्याची तक्रार, चौधरी तरीही मोकळेचअमरावती : शंकर महाराज हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या पिंपळखुटा येथील आश्रमात दहा वर्षांपूर्वीही एका मुलाचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याची माहिती शोधमोहिमेत पुढे आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केल्यास आणखी धक्कादायक बाबींचा उलगडा होऊ शकेल.प्रथमेश सगणे या विद्यार्थ्याच्या गळ्यावर ब्लेडने वार करून त्याचा नरबळी देण्याचा प्रयत्न शंकर महाराज यांच्या आश्रमात ७ आॅगस्ट रोजी घडला. या गंभीर गुन्ह्यातील तीन आरोपी पोलिसांनी पकडले. त्यांनी नरबळीच्या प्रयत्नांचे दोन गुन्हे कबुल केलेत. तपासात निष्पन्न झालेल्या या मुद्यांवर अमरावती ग्रामीण पोलीस समाधानी आहेत. ज्या जिल्ह्याने देशाला संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसारखे वैज्ञानिक दृष्टी बाळगणारे महापुरुष दिलेत, त्या जिल्ह्यातील एका आश्रमात दोन विद्यार्थ्यांचा नरबळी देण्याचा प्रयत्न होतो, ही घटनाच कायद्याच्या रक्षकांना मुळापासून हादरवणारी ठरावी. जे दृष्टीस पडते त्याहीपलिकडचे शोधून काढण्यासाठी पोलिसांनीही तपासाचे आव्हान स्वीकारावे, असेच हे गंभीर प्रकरण.आश्रम हा विश्वशांतीच्या कार्यासाठी निर्मिलेला आहे, अशी भावना आणि विश्वास आश्रमाशी जुळलेल्या लोकांचा आहे. पोलिसांनी त्या मंडळींची ती बाजू निश्चितच विचारात घ्यावी. त्याचवेळी आश्रमात अनेक आक्षेपार्ह कृत्ये घडल्याची निरीक्षणे अनेक सामाजिक संघटनांनी, राजकीय पक्षांनी आणि सामान्य माणसांनी नोंदविलीत. तशी अधिकृत निवेदनेही शासनाला दिलीत. त्यासाठी आक्रमक आंदोलने छेडलीत, त्यांचाही विचार व्हावा. तपास अधिकारी श्रीनिवास घाडगे यांना दोन घटना आणि तीन आरोपींवर समाधान असेल. याशिवाय कुठलीही गैरकायदा बाब आश्रमात घडली नाहीच, असा विश्वास असेल तर हजारो लोकांनी व्यक्त केलेली चिंता आणि निरीक्षणे महत्त्वहीन ठरतात. जिल्हाभरातील हजारो लोक बेदखल ठरतात. शंकर महाराज यांच्या आश्रमात नरबळीचे प्रयत्न घडल्याचे उघडकीस आल्यावर जिल्हाभरात कधी नव्हे ते व्यापक वैचारिक अभिसरण घडून आले. पोटच्या लेकासाठी व्हावे, तसे लोक प्रथमेश आणि अजयसाठी अस्वस्थ झालेत- हे सर्व विनारकारणच घडले असेल काय? लोकांच्या निरीक्षणांना जराही आधार नसेल काय? लोकभावना चुकीची आणि ट्रस्टी योग्य हेच तपासाचे फलित मानायचे काय? कायद्याच्याच आडोशाने बड्यांचे गंभीर गुन्हे दबतात, हा इतिहास आहे. इतिहासाची पुनरावृत्ती येथे घडेल की काय, अशी साशंकता आता सार्वजनिक चर्चेचा मुद्दा झाली आहे. कारणही तसेच आहे- प्रथमेशच्या नातेवाईकांनी ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष शिरीष चौधरी यांच्या नावानिशी धमकावण्याची, प्रथमेशला धोका उत्पन्न करण्याची तक्रार नोंदवूनही श्रीनिवास घाडगे यांना शिरीष चौधरी अटक करावीशी वाटत नाही.