शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

यंदा तापमान उच्चांक गाठणार?

By admin | Updated: June 8, 2014 23:32 IST

नवतपाने विदर्भात कहर केलाय. ४५ डिग्रीच्या आसपास पोहोचलेले तापमान यंदा ‘पन्नाशी’ गाठणार काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी नागपूरमध्ये ४७.५ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

अमरावती : नवतपाने विदर्भात कहर केलाय. ४५ डिग्रीच्या आसपास पोहोचलेले तापमान यंदा ‘पन्नाशी’ गाठणार काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी नागपूरमध्ये ४७.५ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. थोड्याफार फरकाने विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत तापमानाने कहर केला आहे. अमरावती शहरातही तापमान ४६ अंशांच्या पलीकडे गेले आहे. तापमानाच्या ‘हाफ सेंच्युरी’च्या प्रश्नांची झळ फेसबुकलाही पोहचली असून या प्रश्नाला बर्‍याच लाईक मिळत आहेत.पृथ्वीवरील तापमान ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमान वाढत असल्याचा संशोधकांचा अंदाज आहे. त्यामुळे अधिकअधिक वृक्ष लावण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, निसर्गाची देण असणारी झाडे विकासाचा मुद्दा पुढे करून सर्रास तोडली जात आहेत. या माध्यमातून पर्यावरणाचे संतुलन ढासळत असल्याने तापमानही असंतुलित झाले आहे. या असंतुलित तापमानमुळे मानव जीवनसुध्दा प्रभावित होत असल्याचे दिसते.गेल्या काही वर्षांपासून बदललेल्या ऋतुमानाने मानवी जीवनावर मोठा प्रभाव केला आहे. ऊन, पाऊस व थंडीचा समतोलही ढासळला आहे. यंदाचा उन्हाळा सुरुवातीला फारसा जाणवला नाही. मात्र, एप्रिल व मे महिन्यात उन्हाच्या तडाख्याने सजीवांना घायाळ करून सोडले. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ४५ डिग्रीवर गेलेले तापमान दुसर्‍या आठवड्यात ४६.५ डिग्रीवर पोहोचले. नागपूरमध्ये तर तापमानाने उच्चांक गाठला असून ४७.३ पर्यंत पारा गेला आहे. यापेक्षा अधिक तापमान वाढल्यास नागरिकांना कोणत्या संकटाचा सामना करावा लागेल यांची कल्पना न केलेलीच बरी. या वाढत्या तापमानाची चर्चा दररोज सुरू असून आता सोशल मीडियाच्या माध्यमातून तापमानाच्या आलेखावर टीका-टिप्पणी होताना दिसत आहे.