शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

पारा चढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 00:34 IST

शहराच्या तापमानात चांगलीच वाढ झाली असून, मेचा फटका मार्चमध्येच जाणवू लागला आहे. शहराच्या तापमानाने चाळिशी ओलांडली असल्याने अमरावतीकर चांगलेच घामाघूम होऊ लागले आहेत.

ठळक मुद्देशहरवासीय घामाघूम : एसी, कूलर पंख्यांचा वापर वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहराच्या तापमानात चांगलीच वाढ झाली असून, मेचा फटका मार्चमध्येच जाणवू लागला आहे. शहराच्या तापमानाने चाळिशी ओलांडली असल्याने अमरावतीकर चांगलेच घामाघूम होऊ लागले आहेत.वाढत्या तापमानामुळे दुपारी उष्णतेच्या झळा लागू लागल्याने नागरिकांना बाहेर पडले टाळताहेत. उकाड्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी एसी कूलर पंख्यांचा वापर वाढला आहे, तर शीतपेयांच्या स्टॉलवर गर्दी होत आहे.सकाळपासूनच उन्हाचे चटकेमागील आठवड्यापासून शहरासह जिल्हाभरात उन्हाची तीव्रता वाढली आहे. तीन दिवसांपासून पारा वाढला असून, तो सोमवारी ४० अंश सेल्सिअसवर गेला आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून पारा हा चाळिशीवर पोहोचल्याने यावर्षी उच्चांक गाठला आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे उष्म्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून उन्हाचे चटके बसत आहेत. रणरणत्या उन्हामुळे दुपारी १ ते ४ या वेळेत रस्त्यावर तुरळक गर्दी दिसत आहे.पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाशहरासह जिल्ह्यात उन्हाचा पारा ४२ अंशावर पोहोचला आहे. वाढत्या उन्हामुळे जिवाची लाहीलाही होत असून, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरेशा ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मंदिरे, सार्वजनिक इमारती, हॉल, उद्याने आदी दुपारीसुद्धा उघडी ठेवावीत, जेणेकरून नागरिकांना दुपारच्या वेळी येथे आश्रय घेता येईल.रुग्णालये सुरू ठेवा 

उन्हाची तीव्रता वाढली आहे. सध्या ४२ अंश सेल्सिअसवर पारा गेला आहे. पारा हा चाळिशीपार पोहोचल्याने यावर्षी उच्चांक गाठला आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हातील रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र व इतर महत्त्वाच्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित होऊ नये, याची खात्री करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.जिल्हास्तरावरील उपाययोजनानिवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना उष्णतेच्या लाटेसाठी नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात यावे. उष्णतेच्या लाटेची पूर्वानुमान सूचना निर्गमित करण्याची तसेच यासंदर्भात इतर उपाययोजना राबविण्याची जबाबदारी नोडल अधिकाºयांची राहणार आहे. तालुकास्तरावर तहसीलदारावर नोडल अधिकारी म्हणून ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.९ एप्रिलपर्यंत विदर्भात हलका पाऊस?विदर्भ, तेलंगणा व मराठवाड्यात ५ आणि ६ एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी वावटळीसह गडगडाटी पावसाची शक्यता हवमानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे. याशिवाय ७ ते ८ एप्रिल दरम्यान काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. उत्तरेकडील मैदानी भागात धुळीच्या वादळाची शक्यता असून, मध्य भारतात उष्णतेची लाट ४८ तास कायम राहणार आहे. दरम्यान, कमाल तापमान ४० ते ४१ आणि किमान तापमान १८ ते १९ अंश सेल्सियस राहण्याचे संकेत आहेत. उत्तर छत्तीसगडवर १.५ किमी. उंचीवर चक्राकार वारे वाहत असून, या वाºयापासून विदर्भ, मराठवाडा अंतर्गत कर्नाटकापर्यंत कमी दाबाची द्रोणीय स्थिती आहे. लक्षद्वीपभोवताल दीड किमी उंचीवर चक्राकार वारे आहेत. या स्थितीवरून पावसाचा अंदाज बंड यांनी वर्तविला आहे.