अमरावती; जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे एप्रिल व मे अशा दोन महिन्यांचे वेतन थकीत असल्याने त्यांना कर्जाच्या किस्तीसह अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक एकल शिक्षक केवळ वेतनाच्या भरोश्यावर असल्याने त्याची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे रखडलेले वेतन त्वरित देण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे. विशेष म्हणजे इतर विभागांचे वेतन झाले आहे.
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना जून महिना उजाळला तरी एप्रिल व मे या दोन महिन्यांचे वेतन अद्याप मिळाले नाही. त्यामुळे शिक्षकांची आर्थिक परिस्थिती खालावली असून, शिक्षकांवर कर्जाचा डोंगर उभा ठाकला आहे. एप्रिल व मे महिन्याचे वेतन तत्काळ मिळावे, अशी मागणी जिल्ह्यातील एकल शिक्षकासह सर्वच शिक्षकांनी केली आहे.