शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचे आंदोलन सातव्या दिवशीही सुरूच

By admin | Updated: March 18, 2016 00:13 IST

विनाअनुदानित शाळांच्या अनुदानासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर आमदार एकवटलेत. जोवर शासन मागण्या मान्य करीत नाहीत, ...

मागण्यांची पूर्तता करा : शेखर भोयर यांची मागणी अमरावती : विनाअनुदानित शाळांच्या अनुदानासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर आमदार एकवटलेत. जोवर शासन मागण्या मान्य करीत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले जाणार आहे. शासनाने शिक्षकांवर सतत १५ वर्षे हेतुपुरस्सर अन्याय केल्याची खंत यावेळी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी व्यक्त केली. या आंदोलनात औरंगाबादचे आमदार सतीश चव्हाण, अकोला येथील आ. पिचड, नाशिक येथील आ. सुधीर तांबे, आ. विक्रम काळे, रायुकाँचे अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी बुधवारी बेमुदत धरणे आंदोलनाला भेट दिली. या आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. सर्व घोषित शाळांना अनुदान, अघोषित शाळांना घोषित करून अनुदानाबाबत विधिमंडळाच्या आर्थिक अधिवेशनात घोषणा करण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले होते. या धर्तीवर शासनाला जाब विचारला जाणार आहे. आंदोलनाच्या सातव्या दिवशी आ. गाणार, महाराष्ट राज्य कायम विनाअनुदानित कृती समितीचे तात्यासाहेब म्हसकर, खंडेराव जगदाळे, प्रशांत रेडीज, यादव शेळके, अमित प्रसाद, प्रवीण पारिसे, पुंडलिक रहाटे आदी उपस्थित होते. अनुदानाची व पोटापाण्याची ही लढाई अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. विधिमंडळात आश्वासनानुसार रीतसर घोषणा न केल्यास आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा यावेळी शेखर भोयर यांनी दिला. (प्रतिनिधी)