शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक बदल्यांना सलग यंदाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:13 IST

अमरावती : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या यंदाही कोरोनामुळे रखडण्याची दाट शक्यता आहे. सलग दुसऱ्यावर्षी बदल्या होणार ...

अमरावती : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या यंदाही कोरोनामुळे रखडण्याची दाट शक्यता आहे. सलग दुसऱ्यावर्षी बदल्या होणार नसल्याने दुर्गम भागातील बदलीपात्र शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

यंदा बदलीच्या धोरणात काही प्रमाणात बदल झालेला आहे. त्यामुळे शिक्षकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण शासनाने कोरोनाचे कारण देऊन ३० जूनपर्यंत कुठल्याही प्रवर्गाच्या बदल्या करू नयेत, असे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे सर्वच कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना तूर्तास ब्रेक लागला आहे. दरवर्षी जिल्हा परिषदेत सर्वाधिक चर्चेत प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या राहतात. परंतु गत दोन वर्षांपासून शिक्षकांच्या बदल्याच झालेल्या नाहीत. त्यामुळे शिक्षकांचा दुर्गम अर्थात अवघड भागातील सेवा कालावधी वाढून त्यांच्या बदल्यांची प्रक्रिया लांबणार आहे.

बॉक्स

ऑनलाईन पोर्टल

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी चार वर्षांपूर्वी ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले होते. त्यानुसार थेट राज्यस्तरावरूनच बदली प्रक्रिया राबविली जात होती. त्याला सुरुवातीला शिक्षक संघटनांचा विरोध झाला. परंतु या प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप कमी आणि पारदर्शकता अधिक राहत असल्याने शिक्षक संघटनांनी देखील या प्रक्रियेला स्वीकारले. त्यानुसार दोन वर्षे अर्थात २०१७-१८ व २०१८-१९ या वर्षात बदल्या केल्या. गेल्यावर्षी अर्थात २०२० मध्ये बदल्या कोरोनामुळे होऊ शकल्या नाहीत. यंदाही तीच स्थिती आहे.

बॉक़्स

जिल्ह्याची स्थिती...

जिल्ह्यात १४ तालुके आहेत. त्यापैकी बारा तालुके पूर्णत: सपाटीचे आहेत, तर दोन तालुके पूर्णत: दुर्गम आहेत. एका तालुक्याचा काही भाग हा दुर्गम भागात मोडला जातो. अवघड व सोपे क्षेत्र ठरविताना अनेक वादविवाद झाले होते. परिणामी दुर्गम तालुक्यात सेवा करूनही त्यांची ती सेवा दुर्गम भागात ग्राह्य धरली गेली नाही.

बॉक्स

संख्या वाढतच जाणार...

सलग दोन वर्षे बदल्या रखडल्याने दुर्गम भागातील शिक्षकांमध्ये नाराजी, तर सोप्या क्षेत्रातून दुर्गम भागात बदलीपात्र शिक्षकांमध्ये आणखी काही काळ बदली रखडल्याने समाधान व्यक्त होत आहे. बदलीपात्र शिक्षकांची संख्या वाढतच जाणार असून त्यामुळे सोयीचे गाव निवडताना कसरत होईल.

कोट

यंदा सर्व प्रकारच्या बदल्यांना ३० जूनपर्यंत शासनाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे शिक्षकांच्या बदल्यादेखील होणार नाहीत हे स्पष्ट आहे. आता ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळे स्थानिक ठिकाणी त्याबाबत हस्तक्षेप होऊ शकत नाही.

- एजाज खान

प्राथमिक शिक्षणाधिकारी