शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

तिवसा तालुक्यात कांदा अवकाळी पावसाने खराब ?

By admin | Updated: May 9, 2016 00:13 IST

तालुक्यातील कास्तकार आधीच सततची नापिकी व दुबार पेरणीचे संकट या दृष्टचक्रात अडकला असताना अवकाळी पावसाने हाती आलेले कांद्याचे पीक वांध्यात आणले.

तिवसा, गुरुकुंज (मोझरी) : तालुक्यातील कास्तकार आधीच सततची नापिकी व दुबार पेरणीचे संकट या दृष्टचक्रात अडकला असताना अवकाळी पावसाने हाती आलेले कांद्याचे पीक वांध्यात आणले. कांदा पिकाला या निसर्गाच्या लहरीपणाचा पुन्हा एकदा फटका बसला आणि कांदा पिकाला मोठी हानी पोहोचवली आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा कांदा पळवल्याने शेतकरी पुन्हा विवंचनेत सापडले आहे.गुरूवारी दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा जबर तडाखा अमरावती जिल्हाासह तिवसा तालुक्यातही बसला आणि शेतकऱ्यांचा कांदा पिकाचे नुकसान झाले, आधीच खरीप व रबी हंगाममातील पिकांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. मात्र, शेतकऱ्यांना आशा होती की, कांदा उत्पादन तरी चांगले होईल, म्हणून शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन कांदा पिकाची लागवड केली. गुरूवारी आलेल्या पावसाने व वादळी वाऱ्याने कांदा या पिकाला जबर तडाखा बसला. अचानकच आलेल्या या पावसाने शेतकरी आपल्या पिकाचे संरक्षण करू शकले नाही त्यामुळे जबर फटका या कांदा पिकाला बसला. तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचा कांदा अध्यापही उघड्यावर कापणी करता शेतातच पडला असून, त्या कांद्यांना सड लागण्यास सुरूवात झाली आहे शेतकऱ्यांना वेळेवर मजूर मिळत नाहीे. त्यामुळे शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडला असून या पिकांपासूनही मुद्दल निघण्याची हमी नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसांवर शेतकऱ्यांचा खरीप हंगाम येऊन ठेपला आहे. पेरणीची चिंता बळीराजाला लागली आहे. (तालुका प्रतिनिधी)