शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
2
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
3
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
5
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
6
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
7
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
8
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
9
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात, दोन ठार, चार जखमी
10
Video: फरार विजय मल्ला अन् ललित मोदीची लंडनमध्ये ग्रँड पार्टी; ख्रिस गेलसह अनेकजण उपस्थित
11
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
12
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
13
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
14
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
15
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
16
Kandenavami 2025 : शास्त्रात नसूनही आज शास्त्र समजून केली जाते कांदेनवमी; घरोघरी रंगतो कांदेभजीचा फक्कड बेत!
17
चीनमध्ये जिनपिंग पर्व संपुष्टात? १६ दिवसांपासून बेपत्ता; सत्तेतून बेदखल होण्याची चिन्हे....
18
"राक्षस मोकाट फिरतायेत...", मनसेची अमराठी हॉटेल मालकाला मारहाण; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट
19
एक मिनिटात तत्काळ तिकीट, रेल्वेच्या नव्या नियमानंतर काढली अशी पळवाट, टेलिग्रामवर रॅकेट सक्रिय
20
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त

तपोवनातील मुलींचे अखेर स्थानांतरण!

By admin | Updated: December 29, 2014 23:33 IST

विदर्भ महारोगी सेवा संस्थेंतर्गत चालविण्यात येणाऱ्या बालगृहातील ११५ मुलींचे अखेर आज स्थानांतरण करण्यात आले. सहा तास चाललेल्या या कारवाईदरम्यान अनेक मुलींचे डोळे पाणावले होते.

११५ मुली हलविल्या : होलीक्रॉस, चांदूरच्या बालगृहात दाखलअमरावती : विदर्भ महारोगी सेवा संस्थेंतर्गत चालविण्यात येणाऱ्या बालगृहातील ११५ मुलींचे अखेर आज स्थानांतरण करण्यात आले. सहा तास चाललेल्या या कारवाईदरम्यान अनेक मुलींचे डोळे पाणावले होते. तपोवनात कनिष्ठ वरिष्ठ बालगृह हे मुलामुलींचे आणि आणि निराधार-निराश्रीत हे केवळ मुलींचे अशी दोन बालगृहे आहेत. या दोन्ही बालगृहांत एकूण ११५ मुली वास्तव्यास होत्या. या बालगृहातील मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे समाजमन सुन्न झाले होते. त्यानंतर सामाजिक संघटना आणि प्रसिद्धी माध्यमांनी न्यायाची मागणी उचलून धरल्यावर दोषींवर कारवाई सुरू झाली. अनेक मासे त्यात अडकू लागलेत. प्रकरण झाकण्यापलिकडे गेल्याचे लक्षात आल्यावर, येथे मुली असुरक्षित आहेत. त्यांना आवश्यक संरक्षण प्रदान करण्याची संस्थेची आर्थिक क्षमता नाही, अशी सबब पुढे करून मुलींचे इतरत्र स्थानांतरण करण्याची विनंती महिला व बाल कल्याण समितीला संस्थेने एका पत्राद्वारे केली होती. एव्हाना बाल कल्याण समितीही याच निर्णयाप्रत पोहोचली होती. संस्थेकडूनच पत्र आल्यानंतर बालकल्याण समितीने मुलींना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयानुसार आज अंमलबजावणी करण्यात आली. अमरावतीच्या होलीक्रॉस बालगृहात १७, चांदूरबाजारच्या मुले व मुलींचे बालगृह येथे ५४ मुली स्थानांतरीत करण्यात आल्यात. ४४ मुलींना त्यांच्या पालकांच्या सुपूर्द करण्यात आले. सकाळी ११.३० पासून सुरू झालेली ही कारवाई सायंकाळी ५ वाजता पूर्ण झाली. महिला व बाल कल्याण समितीचे सर्व पदाधिकारी तसेच पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे, सहायक पोलीस आयुक्त एस.एन.तडवी हे यावेळी जातीने उपस्थित होते. (प्रतिनिधी)