अमरावती : तिवसा मतदारसंघातील तिवसा नगरपंचायतविषयी शासनाची काय भूमिका आहे? अशी विचारणा आ. यशोमती ठाकुर यांनी पुरवणी यात्री सत्रात विधानसभा अध्यक्षांकडे सोमवारी सायंकाळच्या पुरवणी यादी सत्रात केली. यावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी तालुका मुख्यालयी यादी सत्रात केली. यावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी तालुका मुख्यालयी असणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार नाहीत त्या ठिकाणी नगरपंचायतीच्या निवडणुका होतील, असे आश्वासन सभागृहाला दिले.अमरावती जिल्ह्यातील तिवसा, भातकुली, नांदगाव खंडेश्वर व धारणी या तालुक्याच्या मुख्यालयी यापूर्वीच्या आघाडी सरकारने ‘क’ वर्ग नगरपंचायतीचा दर्जा दिला, राजपत्रात अधिसूचना प्रसिध्द झाली. दावे, हरकती याची सुनावनी होऊन जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या ठरावासह तसेच ग्रामपंचायत मासिक सभा व आमसभेचा ठराव शासनाकडे पाठविण्यात आला. नगरपंचायतीचा दर्जा दिला म्हणजे अधिसूचीत क्षेत्र नागरी झाले. या नागरी झालेल्या तिवसा नगरपंचायत क्षेत्रात पंचायत समितीची निवडणूक कसी घेण्यात आली असे वृत्त 'लोकमत'ने दिले असता नगरपंचायतींना शासनमान्यता नाही, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले. त्यामुळे या चारही तालुका मुख्यालयी येत्या सहा महिन्यांत ग्रामपंचायतींच्या निवडणुका होतील, असे स्पष्ट झाले. मात्र आ. यशोमती ठाकुरांच्या प्रश्नावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आश्वासन दिल्याने तालुका मुख्यालयी ग्रामपंचायत होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
तालुका मुख्यालयी ग्रा.पं. ऐवजी पालिका निवडणुका
By admin | Updated: December 15, 2014 22:47 IST