शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

‘आरएफओं’विरूद्धचे गुन्हे मागे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 22:36 IST

वाघांच्या अवयवांसह अटक केलेला आरोपी वनकोठडीतून पळून गेल्यानंतर त्याचा मृतदेह आढळल्याप्रकरणी दोन वन परिक्षेत्राधिकाºयांवर (आरएफओ) पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देप्रधान वनसचिवांना साकडे : फॉरेस्ट रेंजर्स असोसिएशन सरसावली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वाघांच्या अवयवांसह अटक केलेला आरोपी वनकोठडीतून पळून गेल्यानंतर त्याचा मृतदेह आढळल्याप्रकरणी दोन वन परिक्षेत्राधिकाºयांवर (आरएफओ) पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे अन्यायकारक असून ते तत्काळ मागे घ्यावेत, अशी मागणी शुक्रवारी ‘फॉरेस्ट रेंजर्स असोसिएशन’ने राज्याच्या प्रधान वनसचिवांकडे केली आहे.अमरावती येथे आजपासून दोन दिवसीय वनपरिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेसाठी प्रधान वनसचिव विकास खारगे आले असताना त्यांना मागणीचे निवेदन दिले. यावेळी ‘फॉरेस्ट रेंजर्स असोसिएशन’चे अध्यक्ष के.व्ही. बोलके यांनी प्रधान वन सचिवांकडे एकूण घटनाक्रम विशद केला. पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत देवीदास तुकाराम कुंभरे व बाबूलाल मन्साराम कुंभरे यांना २६ जून २०१७ रोजी वन्यप्राणी, व्याघ्रांच्या अवयवासह वनाधिकाºयांनी अटक केली होती. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. एकूण १७ आरोपींना अटक केली आहे. आतापर्यंत तीन वाघांचे अवयव जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणातील आरोपी देवीदास कुंभरे यास पहिल्यांदा अटक करताना तो पळाला आणि खड्ड्यात पडून त्याचा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्याने पोलीस ठाणे देवलापूर येथे ११ सप्टेंबर २०१७ रोजी वनधिकाºयांविरुद्ध खोटी तक्रार दाखल केली. व्याघ्र अवयव तपासात जि.प.सदस्य शांताबाई कुंभरे यांनी हस्तक्षेप केला आहे. १८ आॅगस्ट २०१७ रोजी धवलापूर येथील आरोपी महादेव उईके कस्टडीतनू पळाला व २६ आॅगस्ट रोजी त्याचेच गावाजवळ मृतदेह आढळला. याप्रकरणी पवनीचे आरएफओ पी.एस.पाखले, नागलवाडीचे एन.आर.गावंडे यांचेविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे व्याघ्र शिकारप्रकरणी वनक्षेत्राधिकाºयांवर राजकीय दबाब आणला जात असल्याची कैफियत आरएफओंनी मांडली. यावेळी के.व्ही. बोलके, ए.आर.देवकर, जी.बी.लांबाडे, प्रशांत भुजाडे, कैलास भुंबर आदी आरएफओ उपस्थित होते.