शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
2
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
3
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
4
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
5
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
6
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्
7
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
8
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
9
प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
10
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
11
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
12
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
13
६ महिन्यात सोन्यात तब्बल २६% वाढ! आता अजून वाढणार? 'या' ५ मार्गांनी करू शकता गुंतवणूक
14
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
15
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
16
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
17
पती निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्रकिनाऱ्यावरच रोमँटिक झालं कपल; बघा लेटेस्ट VIDEO
18
नो फोटो प्लीज! सिद्धार्थ मल्होत्राची पापाराझींना विनंती; म्हणाला, "फक्त आशीर्वाद द्या..."
19
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
20
'ही' आयटी कंपनी देणार २५०% लाभांश, तुमच्याकडे शेअर आहेत का? रेकॉर्ड डेट लगेच बघा!

मधुर वाणी, प्रेमाच्या बळावर इंदूर स्वच्छतेत देशात नं. १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 22:30 IST

मध्यप्रदेशची व्यावसायिक राजधानी असलेल्या इंदूर शहराने इतिहासात सुवर्ण अक्षराने आपले नाव कोरले. देशातील सर्वात सुंदर, स्वच्छ शहराचा मान सलग दोन वर्षे या शहराने पटकावला. मधुर वाणी आणि प्रेमाच्या बळावर तब्बल ३२ लाख नागरिकांची मने जिंकण्याचे काम ‘इंदूर नगर निगम’ म्हणजेच महापालिकेने केले.

ठळक मुद्देअफाट इच्छाशक्ती : ३२ लाख नागरिकांचे पाठबळ मिळविले इंदूर झाले चकाचकअमरावती का नाही?

मुजीब देवणीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मध्यप्रदेशची व्यावसायिक राजधानी असलेल्या इंदूर शहराने इतिहासात सुवर्ण अक्षराने आपले नाव कोरले. देशातील सर्वात सुंदर, स्वच्छ शहराचा मान सलग दोन वर्षे या शहराने पटकावला. मधुर वाणी आणि प्रेमाच्या बळावर तब्बल ३२ लाख नागरिकांची मने जिंकण्याचे काम ‘इंदूर नगर निगम’ म्हणजेच महापालिकेने केले.मागील काही वर्षांमध्ये हे शहर अतिशय गलिच्छ होते. शहरात आलेल्या पाहुण्यांना एक दिवसही थांबावे वाटत नव्हते. महापालिकेला भ्रष्टाचाराची वाळवी लागली होती. तिजोरीवर अक्षरश: दरोडे पडत होते. इतर शहरांप्रमाणेच नागरिकांचा तेथील महापालिकेवरील विश्वास उडाला होता. केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत मिशन’या योजनेच्या पहिल्याच वर्षी इंदूरचा देशभरात १४९ वा क्रमांक आला होता. याला महापालिकाच जबाबदार होती. अशा दयनीय अवस्थेत मध्यप्रदेश शासनाने १९९७ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले मनीष सिंह यांची ३० मे २०१५ रोजी इंदूर महापालिका आयुक्त म्हणून नेमणूक केली. त्यांच्या नियुक्तीपूर्वीच आमदार मालिनी गौड जनतेतून महापौर म्हणून निवडून आल्या होत्या. महापालिकेत रुजू होताच आयुक्त मनीष सिंह यांनी महापौरांची परवानगी घेऊन शहर स्वच्छ, सुंदर आणि देशात प्रथम क्रमांकावर आणण्याची इच्छा व्यक्त केली.महापौरांनीही परवानगी दिली. राजकीय हस्तक्षेप अजिबात चालणार नाही, असेही आयुक्तांनी ठणकावून सांगितले. इंदूरला देशात प्रथम क्रमांक मिळवून देण्यासाठी त्रिसूत्रीवर काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिले म्हणजे शहर कचराकुंडीमुक्त करणे, दुसरे सर्वच रस्त्यांवर असलेल्या धूळ-कणांना हद्दपार करणे आणि तिसरे प्रत्येक घरातून कचरा जमा करणे. या अवघड कामाचा धनुष्य त्यांनी पेलला.दोन वॉर्डांमध्ये पायलट प्रकल्पशहरातील दोन वॉर्ड पायलट प्रकल्प म्हणून निवडण्यात आले. या वॉर्डातील कचराकुंड्या गायब करण्यात आल्या. शंभर टक्के डोअर- टू- डोअर कचरा कलेक्शनवर भर देण्यात आला. हा प्रकल्प राबवीत असताना नागरिकांची मानसिकता, क्षणाक्षणाला येणाऱ्या अडचणींचा आयुक्त स्वत: अत्यंत बारकाईने अभ्यास करीत होते. जागेवरच या अडचणी सोडविण्यावर त्यांचा सर्वाधिक कल होता. नगरसेवक, सामाजिक संघटना, शालेय विद्यार्थी यांच्या मदतीने दोन्ही वॉर्ड कचरामुक्त करण्यात आले. या दोन वॉर्डाने संपूर्ण महापालिकेला शहर स्वच्छ होईल, असा विश्वास दिला.‘कभी महक की तरह हम गुलों से उड़ते हैं,कभी धुएं की तरह पर्वतों से उड़ते हैंये केचियाँ हमें उड़ने से खाक रोकेंगी,की हम परों से नहीं हौसलों से उड़ते हैं’हा राहत इंदौरी यांचा शेर डोळ्यासमोर ठेवून महापालिकेने अखेर गगनभरारी घेण्याचा निर्णय घेतला.एकेकाळी अस्वच्छ शहरात गणती होणाऱ्या मध्यप्रदेशातील इंदौर शहराने सक्षम अधिकारी, कठोर निर्णय, लोकजागृती आणि राज्य सरकारचे पाठबळ या जोरावर देशातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर शहर होण्याचा मान मिळविला आहे. औरंगाबादमध्ये मागील पाच महिन्यांहून अधिक काळ कचराकोंडीची समस्या निर्माण झाली आहे. अमरावतीतही नागरिकांना कचरा व अशाच समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाची चमू थेट इंदूर शहरात दाखल झाली. महापौर, अधिकारी आणि नागरिकांच्या भेटी घेतल्या. इंदूर शहराने स्वच्छतेची किमया केली कशी? हे लोकमत प्रतिनिधींनी जाणून घेतले. इंदूर चकाचक झाले मग अमरावती का होऊ शकत नाही? इंदूरच्या स्वच्छता कार्याविषयीची मालिका आजपासून देत आहोत.भ्रष्ट कंपनीची हकालपट्टीआयुक्त मनीष सिंह यांनी शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला. या यंत्रणेतील भ्रष्टाचाऱ्यांना टार्गेट केले. शहरातील कचरा जमा करणाऱ्या ‘ए-टू-झेड’कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात आले. कंपनी वाहनांमध्ये माती-कचरा भरून दररोज ७००-८०० मेट्रिक टन कचरा उचलल्याचा दावा करीत होती. कंपनीसोबत हातमिळवणी करणाऱ्यां अधिकाऱ्यांनाही कर्तव्याची जाणीव करून देण्यात आली. आयुक्त स्वत: सकाळी ६ ते रात्री २ वाजेपर्यंत रस्त्यांवर फिरून काम करू लागले. त्यामुळे कुंभकर्णी झोपेत असलेली संपूर्णयंत्रणा खडबडून जागी झाली.