शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

वरुडात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आक्रोश मेळावा

By admin | Updated: November 15, 2016 00:10 IST

शेतकऱ्यांसाठी लढा देणाऱ्या युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भाध्यक्ष देवेंद्र भुयार यांच्यावर ...

देवेंद्र भुयारच्या तडीपारीचा निषेध : शेतकऱ्यांची लक्षणीय उपस्थितीवरुड : शेतकऱ्यांसाठी लढा देणाऱ्या युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भाध्यक्ष देवेंद्र भुयार यांच्यावर शेतकरी आंदोलनादरम्यान गुन्हे दाखल करून प्रशासनाने दोन वर्षांकरिता तडीपार केले. शासनाचा हाच न्याय असेल तर सरळ दाउद इब्राहीमला देशाचा प्रधानमंत्री तर अरुण गवळीला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा, असा सल्ला प्रशासनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांनी रविवारी बेनोडा येथे आयोजित आक्रोश मेळाव्यात केले.देवेंद्र भुयार यांनी शेतकऱ्यांच्या दु:खावर फुंकर घालण्याकरिता आंदोलने केली. हा त्यांचा गुन्हा आहे काय? युवा नेतृत्व संपविण्याचा हा राजकीय प्रयत्न असल्याचा आरोपही खा. शेट्टी यांनी केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक गुणवंत देवपारे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्य वस्त्रोउद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, निर्मला भुयार, महादेवराव भुयार ,प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोकळे, प्रदेश प्रवक्ता गजानन अमदाबादकर, जिल्हाप्रमुख अमित अढावू, युवा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष आशिष वानखडे, उमेश बंड, पुण्याचे बापूसाहेब करंडे, बुलढाण्याचे जिल्हाप्रमुख श्याम अवथळे, श्रीहरी सावरकर, मंगेश ठाकरे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी वस्त्रोउद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनीसुध्दा शासनावर आणि पोलिसांवर चांगलीच तोफ डागली. आक्रोश मेळाव्याला परिसरातून शेकडो शेतकरी, शेतमजूर तसेच युवकांची उपस्थिती होती. बेनोडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला. मेळाव्याकरिता उपजिल्हाप्रमुख मंगेश ठाकरे, तालुकाप्रमुख शैलेश ढोबळे, सुमित गुर्जर, उमेश डबरासे, ऋषिकेश राउत, प्रवीण देशमुख, विवेक आलोडे आदींनी प्रयत्न केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप गवई, वरुडचे ठाणेदार गोरख दिवे, शेंदूरजनाघाटचे एस.एन नितनवरे तसेच बेनोडा (शहीद) चे ठाणेदार शांतीकुमार पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (तालुका प्रतिनिधी)