शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याची नोकरी धोक्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:10 IST

हरिसाल येथील दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण, परीविक्षाधीन कालावधी संपण्यापूर्वीच गंभीर गुन्हा दाखल अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण ...

हरिसाल येथील दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण, परीविक्षाधीन कालावधी संपण्यापूर्वीच गंभीर गुन्हा दाखल

अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेला निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याची आयएफएस नोकरी धोक्यात आली आहे. विनाेद याच्यावर परीविक्षाधीन कालावधी संपण्यापूर्वीच आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे, गर्भपात, शिवीगाळ अशा गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे अचलपूर न्यायालयात शिवकुमार याने जामीन अर्ज सादर केला असून, आता याकडे लक्ष लागले आहे.

भारतीय वनसेेवा कॅडरमधील उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांची सेवा आहे. मेळघाटात सातत्याने वादग्रस्त असणारे विनोद शिवकुमार याच्या जाचाला कंटाळून दीपाली चव्हाण यांनी २५ मार्च २०२१ रोजी निवासस्थानी आत्महत्या केली होती. मात्र, विनोद शिवकुमार याने मराठी भाषा परीक्षा अद्यापही उत्तीर्ण केली नाही. अशातच परीविक्षाधीन कालावधी संपण्यापूर्वीच गंभीर गुन्हे त्याच्याविरूद्ध दाखल झाले. त्यामुळे विनोद शिवकुमार याची विभागीय चौकशी होण्यापूर्वीच त्याला सेवेतून बाद होऊ केले जाऊ शकते. प्रशासकीय सेवेतील अधिकारी वादग्रस्त अथवा गंभीर गुन्ह्यात सामील असेल तर अशावेळी राज्य घटनेतील तरतुदीनुसार शासनाला संंबंधित अधिकाऱ्याला सेवेतून बडतर्फ करण्याचे अधिकार आहे. त्यानुसार विनाेद शिवकुमार याला केंद्र शासन राष्ट्रपतीच्या मंजुरीनंतर नोकरीतून बडतर्फ करू शकते, अशी माहिती एका ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. विनोद शिवकुमार यांच्याबाबत राज्याच्या वन खात्याचे वनबलप्रमुख पी. साईप्रसाद यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाही.

----------

दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी दोषारोप पत्र कोर्टात सादर झाले आहे. आता परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला असून, तपासदेखील पूर्ण झाला आहे. आता आरोपीला कारागृहात ठेवणे अशक्य असते, अशी कायद्याची परिभाषा आहे.

- परीक्षित गणोरकर, सरकारी अभियोक्ता, अमरावती