शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. भोजनेंच्या गर्भपात केंद्राची नोंदणी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 22:22 IST

स्थानिक बुटी प्लॉट स्थित डॉ. वैशाली भोजने यांच्याकडील वैद्यकीय गर्भपात केंद्राची नोंदणी निलंबित करण्यात आली आहे.

ठळक मुद्देचौकशी सुरू : प्रथमदर्शनी निष्कर्षावरून कारवाई

आॅनलाईन लोकमतअमरावती : स्थानिक बुटी प्लॉट स्थित डॉ. वैशाली भोजने यांच्याकडील वैद्यकीय गर्भपात केंद्राची नोंदणी निलंबित करण्यात आली आहे. त्यांना वैद्यकीय गर्भपात करण्यास मनाई करण्यात आली असून, त्यांनी वैद्यकीय गर्भपात केंद्राचा फलक लावू नये, असेही बजावण्यात आले आहे. महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.एमटीपी कायद्यान्वये बुटी प्लॉट येथील भोजने मॅटर्निटी व नर्सिंग होमच्या ठिकाणी वैद्यकीय गर्भपात केंद्राला मान्यता देण्यात आली असून, ते महापालिकेत नोंदणीकृत होते. मूर्तिजापूर तालुक्यातील रहिवासी असलेल्या एका ३५ वर्षीय महिलेचा येथे गर्भपात करण्यात आला होता. ती भोजने यांच्याकडे उपचार घेत होती. ही महिला रुग्ण १२ डिसेंबरला भोजने यांच्याकडे उपचाराकरिता आली असता, भोजने यांनी तिला दाखल करून आॅपरेशन थिएटरमध्ये घेतले. मात्र, पुढील उपचाराकरिता आयसीयूची गरज भासू शकते म्हणून भोजने यांनी त्या महिलेला प्रथम बोंडे हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे भरती करून न घेतल्याने पीडीएमएमसीमध्ये भरती केले. हा सर्व खुलासा डॉ. भोजने यांनी दिला आहे. या महिलेचा गर्भपात होऊन तिची प्रकृती अतिशय चिंताजनक झाली होती. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने पीडीएमएमसी व डॉ. वैशाली भोजने यांच्याकडून वस्तुस्थिती जाणून घेतली.दरम्यान, रुग्ण महिलेचे बयाण, त्या महिलेच्या पतीचे बयाण, डॉ. वैशाली भोजने यांचा खुलासा यात अनियमितता असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. त्यावरुन नोंदणी (मान्यता) निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली.प्रथमदर्शनी निष्कर्षसंबंधित महिला रुग्णाचा वैद्यकीय गर्भपात करण्यात आला असावा व हेतुपुरस्सर ‘एमटीपी’ रेकॉर्ड न भरता इतर कारणाकरिता भरती झाल्याचे व आपोआप गर्भपात झाल्याचे भासविण्यात आले, असे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे निरीक्षण महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांनी नोंदविले. चौकशी सुरू असून, वैद्यकीय गर्भपात केंद्राची नोंदणी (मान्यता) निलंबित करण्यात आल्याचे डॉ. वैशाली भोजने यांना कळविण्यात आले आहे.