अमरावती : आपले अस्तित्व लपवून रात्री संश्यासपदरित्या फिरताना आढळून आलेल्या एका आरोपीला बडनेरा पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई गुरूवारी रात्री चांदणी चौक बडनेरा येथे करण्यात आली. फिर्यादी शेख रशीद शेख भुरू (२०, रा. मिलचाळ बडनेरा) असे आरोपीचे नाव आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
------------------------------------------------------------
मद्यपान करून अश्लील शिवीगाळ
अमरावती : मद्यपान करून एका महिलेस अश्लील शिवीगाळ केल्याची घटना गुरुवारी शिराळा येथे घडली. आरोपी विनायक बळीराम उके (५०, रा. कलालपुरा, शिराळा) याच्याविरुद्ध वलगाव पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
---------------------------------------------------------
शोभानगरात जुगार पकडला
अमरावती : गाडगेनगर पोलिसांनी शोभानगर येथे कारवाई करून जुगाराच्या साहित्यासह १९५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली. जयसिंह कुंदनसिंह ठाकूर (४५, रा. भाजीबाजार, खोलापुरीगेट ), सूरज काशीनाथ यादव (२७, रा. शोभानगर) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
----------------------------------------------------------------------
गोंधळ घालणाऱ्या मद्यपीला अटकअमरावती : मद्यपान करून गावात धामधूम करीत असल्याचे आढळून आलेल्या इसमाला वलगाव पोलिसांनी शिराळा येथून गुरुवारी रात्री ताब्यात घेतले. लखन केशवराव चांदणे(३०, रा. शिराळा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.
-----------------------------------------------------------------