शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी सूर्यवंशी, डेहनकर शहराध्यक्ष

By admin | Updated: January 18, 2016 00:02 IST

भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी दिनेश सूर्यवंशी तर शहराध्यपदी जयंत डेहनकर यांची रविवारी अविरोध निवड करण्यात आली.

निवडणूक : ढोलताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, हार-तुऱ्यांचा वर्षावअमरावती : भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी दिनेश सूर्यवंशी तर शहराध्यपदी जयंत डेहनकर यांची रविवारी अविरोध निवड करण्यात आली. यावेळी ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, हार- तुऱ्यांचा वर्षाव अन् पेढे भरवून नवनियुक्त अध्यक्षांचे कौतुक करण्यात आले. स्थानिक राजापेठस्थित भाजपा कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. प्रारंभी जिल्हाध्यक्ष तर नंतर शहराध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अकोला येथील तेजराव थोरात, चिखली येथील विजय कोठारी यांनी कामकाज सांभाळले. जिल्हाध्यक्षपदासाठी दिनेश सूर्यवंशी तर शहराध्यक्षपदासाठी जयंत डेहनकर यांच्या नावे प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाला. ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले. यापूर्वी भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी आ. प्रकाश भारसाकळे तर शहराध्यपदी नगरसेवक तुषार भारतीय होते. मात्र संघटनात्मकदृष्ट्या भाजपाने जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्याचे ठरविले होते. त्यानुसार रविवारी ही निवडणूक पार पडली. भाजपच्या जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षपदी नवा चेहरा कोण? ही उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली होती. सूर्यवंशी, व डेहनकर यांच्या निवडीने याबाबतच्या चर्चांवर पूर्णविराम लागला आहे. निवडणुकीदरम्यान भाजपाचे प्रदेश सरचिटणीस रामदास आंबटकर, आ. सुनील देशमुख, आ. अनिल बोंडे, आ. रमेश बुंदिले, भाजपचे नेते अरुण अडसड, मधुकर उमेकर, भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, किरण पातुरकर, मावळते शहराध्यक्ष तुषार भारतीय, तेजराव थोरात, माजी महापौर किरण महल्ले, रुपेश ढेपे, गजानन कोल्हे, महिला शहराध्यक्ष राधा कुरील, रविंद्र खांडेकर, मुन्ना सेवक, गंगा खारकर, विनय नगरकर आदी भाजपचे नेते उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष जयंत डेहनकर यांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)