शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

सुनील गजभियेचे न्यायालयात आत्मसर्मपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 00:50 IST

शीतल पाटील हत्याकांडातील आरोपी अ‍ॅड.सुनील गजभियेने गुरुवारी अखेर न्यायालयात आत्मसर्मपण केले. गाडगेनगर पोलिसांनी गजभियेला अटक करून पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्यासमोर हजर केले.

ठळक मुद्देसहा दिवसांपासून होता पसार : पोलीस आयुक्तांसमोर पेशी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शीतल पाटील हत्याकांडातील आरोपी अ‍ॅड.सुनील गजभियेने गुरुवारी अखेर न्यायालयात आत्मसर्मपण केले. गाडगेनगर पोलिसांनी गजभियेला अटक करून पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्यासमोर हजर केले. सीपींच्या कक्षात तब्बल पाऊण तास चौकशी चालली. मात्र, गजभियेच्या अटकेनंतरही पोलिसांनी शीतल पाटीलच्या हत्येविषयी नवा खुलासा केलेला नाही.शनिवारपासून शीतल पाटील हत्याकांडातील आरोपी सुनील गजभिये, रहेमान खा व अन्य चार जणांचा पोलीस कसून शोध घेत होते. गजभियेच्या परिचयातील व त्याच्या नातेवाईकांची कसून चौकशी सुरु केली होती. शहरासह अन्य जिल्ह्यातील आक्रमण संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची कसून चौकशी पोलिसांनी सुरू केली. पोलीस चौकशीचा आवळलेला फास पाहता गजभियेने आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. सुनिल गजभियेने गुरुवारी सकाळी १०.१५ वाजता मुख्य न्यायदंडाधिकारी महेश कोठारी यांच्या न्यायालयात आत्मसर्मपण केले. गजभियेच्या आत्मसमर्पणाची माहिती गाडगेनगर पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी न्यायालयात जाऊन गजभियेला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस आयुक्तांसमोर झालेल्या पेशी दरम्यान गजभियेने शीतल पाटीलशी असलेल्या त्याच्या संबंधांविषयी माहिती दिली. १३ मार्च रोजी शितलसोबत असल्याची कबुली गजभियेने पोलीस आयुक्तांना दिली.गजभियेने वापरला भाचाचा मोबाईलपोलीस सूत्रानुसार, सुनील गजभिये गडचिरोली येथे एक दिवस थांबला होता. त्या ठिकाणी कोणाकडे थांबला व का थांबला, याच्या चौकशीकरिता पोलीस पथक गडचिरोली येथे जाणार आहे. तसेच गजभिये त्याच्या लोणी टाकळीजवळील एका गावात राहणाºया भाच्याच्या मोबाईलवरून संपर्क साधत होता.गजभियेचे नातलग व आक्रमण संघटनेच्या पदाधिकाºयांची कसून चौकशी करण्यात आल्याने ते जेरीस आले, ही बाब लक्षात येताच गजभियेने आत्मसमर्पण केले. त्याला अटक करून चौकशी सुरू करण्यात आली आहे.- दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त.

टॅग्स :Murderखून