शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:12 IST

शिंदी येथे आंबेडकर जयंती शिंदी बु : येथील मिलिंद विद्यार्थी मंडळद्वारे भारतरत्त्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात ...

शिंदी येथे आंबेडकर जयंती

शिंदी बु : येथील मिलिंद विद्यार्थी मंडळद्वारे भारतरत्त्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य रत्ना इंगोले यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. उपसरपंच मो. शहजाद यांच्या हस्ते हारार्पण करण्यात आले. यावेळी सत्यवान चव्हाण, मधु इंगळे, संजय वाठ, पंकज मालधुरे, देवू गजभिये, विजय बोरकर उपस्थित होते.

----------

अंजनगाव तालुक्यात अ‍ँटिजन टेस्ट

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील सातेगाव, कापूसतळणी भंडारज, कोकर्डा येथील नागरिकांची रॅपिड अ‍ँटिजेन टेस्ट करण्यात येत आहेत. १४ एप्रिल रोजी स्थानिक पंचायत समितीच्या प्रांगणात अनेकांची अँटिजेन चाचणी करण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी सुधीर डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शिबिरे घेतली जात आहेत.

------------

डॉ. हेडगेवार हॉस्पिटलला एक लाखाची देणगी

अमरावती : परकोटाच्या आतील अतिशय पुरातन, ऐतिहासिक अशा श्री गणेश मंदिराच्या पवित्र मूर्तीच्या पुढ्यात जहागीरदार वाड्याचे पद्माकर आणि मालती जहागीरदार यांनी जनकल्याण सेवा संस्था संचालित डॉ. हेडगेवार हॉस्पिटलच्या आयसीयूसाठी एक लाख रुपयांची भरीव देणगी प्रदान केली. अजय श्रॉफ आणि सचिव गोविंद जोग यांनी या धनादेशाचा स्वीकार केला.

-------

आज स्वरांजलीतून बाबासाहेबांना अभिवादन

अमरावती: विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सिंफनी स्टुडिओ आणि सिंफनी ग्रुप ऑफ म्युझिक कल्चरल अ‍ँड वेलफअर ट्रस्ट ‘स्वरांजली’ सादर करणार आहेत. सिंफनी ट्यून्स या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबूक लाईव्हवर हा कार्यक्रम १८ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता सर्वांना मोफत बघता येईल.

-----------

फोटो पी १७ दर्यापूर रक्तदान

तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने रक्तदान

दर्यापूर : तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने १७ एप्रिल रोजी अध्यक्ष सुधाकर भारसाकळे यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात १०१ लोकांनी रक्तदान केले. शिबिराला जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सभापती बाळासाहेब हिंगणीकर उपस्थित होते. यावेळी ईश्वर बुंदिले, सुनील गावंडे, अभिजित देवके, गजानन जाधव, दीक्षांत पाटील, अमोल जाधव, प्रदीप देशमुख, संजय देशमुख, प्रभाकर तराळ, अविनाश ठाकरे, बबनराव देशमुख, सुधीर पवार, विनोद पवार, संदीप गावंडे, शिवाजी देशमुख, पप्पू होले उपस्थित होते.

----------

तालुक्यातील शाळांना प्रिंटरचे वितरण

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील विविध शाळांना माजी मंत्री रणजित पाटील यांच्या आमदार विकासनिधीमधून लेझर प्रिंटर्सचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी से.फ.ला. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश चांडक अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी पद्माकर घोगरे, श्रीरंग माथुरकर, गोपाल मुंधडा हे उपस्थित होते. संचालन व आभार प्रदर्शन विनायक कडू यांनी केले.

-----------

फोटो पी १७ नांदगाव

नियमाचे उल्लंघन करणाऱ्या १३ जणांविरुद्ध कारवाई

नांदगाव खंडेश्वर : शनिवारी दुपारी महसूल, पोलीस व नगर पंचायत विभागाचे संयुक्त पथक रस्त्यावर उतरले. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या १३ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी तहसीलदार किशोर यादव, मुख्याधिकारी मीनाक्षी यादव, ठाणेदार हेमंत ठाकरे, पीएसआय प्रदीप कांबळे, पोलीस कर्मचारी नरेंद्र काटे, सुषमा नागदेवते, गोपाळ शेंडे, राजेश सरकाटे, नगरपंचायतचे अभिजित लोखंडे, संजय चौधरकर, मो. रहील, नेमिनाथ सानप, गजानन चांदणे यांचा समावेश होता.

---------