शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:09 IST

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील कापूसतळणी येथून १७ हजार ८५० रुपये किमतीचे गोमांस जप्त करण्यात आले. १९ जून रोजी ही ...

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील कापूसतळणी येथून १७ हजार ८५० रुपये किमतीचे गोमांस जप्त करण्यात आले. १९ जून रोजी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी रहिमापूर पोलिसांनी आरोपी शेख इर्शाद शेख वाहीद (२७, रा. कापूसतळणी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

------------

माधान ते काजळी रोडवरून दुचाकी लंपास

चांदूर बाजार : तालुक्यातील माधान ते काजळी रोडवरील शेताच्या धुऱ्यावर ठेवलेली एमएच २७ एटी ५७१२ या क्रमांकाची दुचाकी लंपास करण्यात आली. १६ जून रोजी ही घटना घडली. चांदूर बाजार पोलिसांनी प्रताप देशमुख (काजळी) यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

---------------

तोंडगाव फाट्यावरून दोन ट्रॅक्टर ट्रॉली जप्त

परतवाडा : स्थानिक पोलिसांनी तोंडगाव फाट्यावरून रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर ट्रॉली जप्त केल्या. २० जून रोजी पहाटे ३ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. परतवाडा पोलिसांनी आरोपी शेख जावेद शेख उरूफ (३५, बोरगाव मोहना), राजेश आसराम जाधव (बोरगाव), गोलू अर्डक (रा. शिरजगाव) व संतोष ठाकरे (रा. बोरगाव मोहना) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-----------------

वरूडच्या बारमध्ये तरुणाला मारहाण

वरूड : येथील एका बीअर बारमध्ये सुमीत पाद्य (२९, वरूड) याला मारहाण करण्यात आली. १९ जुन रोजी रात्री ८.३० च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी वरूड पोलिसांनी त्या बारच्या एका वेटरविरुद्ध गुन्हा दाखल केला.

----------

नेरपिंगळाई येथे वृद्धेला शिवीगाळ

मोर्शी : नेरपिंगळाई येथील एका ६२ वर्षीय महिलेला अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. २० जून रोजी ही घटना घडली. याप्रकरणी शिरखेड पोलिसांनी आरोपी दीपक रामराव कुरसंगे (३५, रा. नेरपिंगाळाई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

------------

मांगरुळी पेठ येथे मारहाण

वरूड : तालुक्यातील मांगरूळी पेठ येथे महावितरणच्या कर्मचाऱ्याला लोटलोट करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली तथा सरकारी कामात अडथळा निर्माण करण्यात आला. बेनोडा पोलिसांनी विजय वावरे यांच्या तक्रारीवरून आरोपी मंगेश पांडे (३७, रा. मांगरुळी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-------------------

मोर्शीच्या रेहान पार्कमध्ये इसमावर चाकुहल्ला

मोर्शी : येथील रेहान पार्क भागात शेख समीर वल्द शेख सलीम याच्या डाव्या पायावर चाकूने वार करण्यात आला. फोनवरून चोरून मेसेज टाकण्याचा आरोपावरून २० जून रोजी ही घटना घडली. शेख वसीम यांच्या तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी आरोपी समीर शाह वल्द नजीर शाह (रा. अंबाडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

--------------

मार्डा येथून दुचाकी लंपास

कुऱ्हा : मार्डा येथील एका पंक्चर दुकानासमोर ठेवलेली एमएच २७ बीजी ९५६५ या क्रमांकाची दुचाकी चोरून नेण्यात आली. १९ जून रोजी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी कुऱ्हा पोलिसांनी नीलेश साव (३८, मार्डा) यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

---------------------

मांजरखेड येथे चोरी

चांदूर रेल्वे : तालुक्यातील मांजरखेड येथे सुनील खडसे (४५) यांच्या घरातून पाच हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने चोरीला गेले. २० जून रोजी ही घटना घडली. चांदूर रेल्वे पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

----------------

चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण

चांदूर रेल्वे : तालुक्यातील पळसखेड येथील एका ३५ वर्षीय विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. याप्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांनी आरोपी चरणसिंह चव्हाण, बळीराम चव्हाण, गोपाल चव्हाण व अन्य यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-------------------------